अव्वल अभिनयाशिवाय अल्लू अर्जुन त्याच्या नृत्य आणि फॅशनसाठी लोकप्रिय आहे.
अल्लू अर्जुन हा टॉलिवूडमधील खूप लोकप्रिय अभिनेता आहे. तेलुगु चित्रपटसृष्टीतील एक स्टायलिश स्टार आणि आयकॉन स्टार असेही त्याला संबोधलं जातं. खूप कमी अभिनेते आहेत, ज्यांना अल्लू अर्जुन एवढा चाहता वर्ग लाभतो. अव्वल अभिनयाशिवाय अल्लू अर्जुन त्याच्या नृत्य आणि फॅशनसाठी लोकप्रिय आहे. त्याच्या फॅशन सेन्सकडे पाहिले की त्याला दिला गेलेला स्टायलिश स्टार हा टॅग सार्थ वाटतो. त्याने घातलेले अगदी साधे पोशाखही ट्रेंड बनून जातात. आज आपण अल्लू अर्जुनच्या अशा पोशाखांवर एक नजर टाकणार आहोत, जे तसे साधे आहेत, परंतु तरीही खूप फॅशनेबल वाटतात.

अल्लू अर्जुन प्रिटेंड कुर्त्यामध्ये पोज देत आहे, हा फॅशन जगतातील नवीन ट्रेंड आहे. या लूकमध्ये तो साधा पण तितकाच ग्लॅमरस दिसतो.

सण आणि लग्न आपल्यासाठी महत्त्वाचे क्षण असतात आणि यावेळी आपल्याला हटके दिसायचं असते. अल्लू अर्जुनचा आकर्षक आणि मोहक नक्षीकाम असलेला कुर्ता पायजमा सर्वांचे लक्ष वेधून घेतो.

ऑन-स्क्रीन असो किंवा ऑफ-स्क्रीन, चित्रपट असो किंवा इव्हेंट्स, अगदी साध्या पोशाखामध्ये असतानाही सर्वांचे लक्ष कसं वेधून घ्यायचे हे अल्लू अर्जुनला चांगलं माहित आहे. त्याच्या फॅशनची चाहते नेहमीच नक्कल (कॉपी) करत असतात.

अल्लू अर्जुनचा साधा कुर्ता घातलेला हा हटके पेहराव अगदी तसाच आहे, जसा तुम्हाला सणासुदीला घालण्याची इच्छा असते. तुम्हीही नेहमीच्या जीन्स ऐवजी कुर्ताच्या अशा पांढऱ्या आणि राखाडी छटा वापरून पाहू शकता.

धोती फक्त लग्नात घालावी असे नाही. अल्लू अर्जुनने परिधान केलेली ही धोती आणि कुर्ता घालून तुम्ही कुठेही सहजपणे जाऊ शकता. सोनेरी धोतीची ही फॅशन साधी पण खूप आकर्षक वाटते.
Esakal