नागपूर : पायाच्या तळव्यांमध्ये जळजळ होणे, संवेदना कमी होणे, त्रास जाणवणे या समस्या अनेकांमध्ये आढळतात. वैद्यकीय भाषेत या त्रासाला न्यूरोपथी म्हणतात. पायाची जळजळ वाढण्यासोबतच अनेकांना तळव्यांवर सूज, लालसरपणा किंवा घाम येणे अशी लक्षणे देखील आढळतात. पन्नाशीच्या जवळ असलेल्यांमध्ये हा त्रास अधिक तीव्रतेने आढळून येतो.

बी १२ या जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे हातापायांमध्ये जळजळ किंवा संवेदना कमी होण्याचा त्रास होतो. अनेकांना बी १२ च्या कमतरतेमुळे चालताना त्रास होतो.
वाढत्या वयानुसार मधुमेहींमध्ये न्यूरोपथीचा त्रास वाढत जातो. मधुमेहींमध्ये पायात जळजळ वाढण्याचा त्रास अधिक प्रमाणात असतो.
न्यूरोपथीचा त्रास वाढण्यामागे मद्यपान हे महत्त्वाचे कारण ठरते. दारूमुळे नसांच्या टिश्यूचे नुकसान होते.
क्षयरोग तसेच कॅन्सरच्या औषधांमुळे पायांची जळजळ वाढू शकते.
किडणीचे आजार असणाऱ्यांमध्ये किंवा डायलिसीसवर असणाऱ्यांच्या पायाच्या तळव्यांमध्ये जळजळ जाणवते. एचआयव्ही विषाणूमुळेही हातापायाची जळजळ होऊ शकते.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here