प्रग्नेंसीच्या 24 आठवड्यांमध्ये गर्भात वाढणारे अर्भक नष्ट होण्याला मेडिकल भाषेत Miscarriage म्हणतात. आई-वडिल दोघांसाठी ही खूप धक्कादायक गोष्ट असते. मिसकॅरेजबाबत काही गोष्टी समजून घेणे गरजेचे आहे. जसे की त्याची लक्षण का? का होते Miscarriage?
प्रग्नेंसीच्या सुरवातीच्या 3-4 महिन्यांमध्ये गर्भातील अर्भक नष्ट होण्याला गर्भपात (Miscarriage) म्हणतात. गर्भपात होण्यामागे अनेक कारणे आहेत पण त्यासाठी गर्भवती महिलेला जबाबदार धरणे चुकीचे आहे. बऱ्याच वेळा गर्भपाताचे कारण समजत नाही आणि त्यामुळे हे आणखी भीतीदायक वाटू शकते.
सर्वसाधारणपणे प्रेग्नेंसीच्या पहिल्या 3 महिन्यांमध्ये न जन्मलेल्या बाळचे मिसकॅरेज होऊ शकते. नॅशनल हेल्थ सर्विस (NHS) नुसार, गर्भाशयातील असामान्य क्रोमोझोम्स यासाठी जबाबदार असल्याचे मानले जाते. खरं तर, खूप जास्त किंवा खूप कमी क्रोमोझोम्समुळे गर्भपात होऊ शकतो. या स्थितीमध्ये गर्भाशया वाढणाऱ्या अर्भकाची नीट वाढ होऊ शकत नाही.

मिसकॅरेजमध्ये साधारण 2-5 टक्के केसेस अनुवांशिक असल्याचे मानले जाते. कित्येकवेळा पार्टनर असामान्य क्रोमोझोम्सबाबत लोक माहिती नसते त्यामुळे अर्भकाची वाढ होण्यामध्ये अडचणी निर्माण होउ शकतात. अर्भकामध्ये रक्त आणि पोषक तत्त्वांची कमी होऊ शकते. जर 3 महिन्यांच्या प्रेगन्सीनंतर मिसकॅरेज हे नाजूक गर्भाशय, कोणतेही इन्फेक्शन किंवा सेक्शुअल ट्रांसमिशन डिसीज, गर्भाशयाचा आकार, pco किंवा अन्न विषबाधेमुळे होऊ शकते.
एक्सपर्टच्या मता नुसार, वारं-वांर गर्भपात किंवा उशिरा गर्भापात होण्यामागे कित्येक कारण असू शकतात. ब्लड क्लॉटिंग डिसॉर्डर, थायरॉईडची समस्या, सर्वाइकलमुळे येणारा अशक्तपणा, आपली इम्युन सेल्स देखील प्रजनन क्षमता प्रभावित करू शकतात. मिसकॅरेजचे त्रास सहन करणाऱ्या कित्येक महिलांना भविष्यांमध्ये आई होता पण, जर काही महिलांचे वारंवांर गर्भपात होत असेल किंवा उशीरा गर्भपात होत असेल तर त्यांनी तपासणी करून घ्यावी.

45 वर्षांनंतर होऊ शकतो त्रास
नॅशनल हेल्थ सर्विस (NHS) नुसार, मिसकॅरेजची समस्या खूप सामान्य आहे. आठपैकी एका गर्भवती महिलेचे मिसकॅरेज होते. कित्येक महिलांचे मिसकॅरेज तर त्यांना गर्भवती असल्याचे माहित होण्याआधीच होते. वारंवार गर्भपात (3 किंवा त्यापेक्षा जास्त) होण्याचा त्रास 100 पैकी 1 महिलेला सहन करावा लागतो. वय जास्त असलेल्या महिलांमध्ये मिसकॅरेजची समस्या सहसा जास्त दिसून येते. 30 पेक्षा कमी वय असलेल्या 10 पैकी एक महिलेचे गर्भपात होते. पण 45 पेक्षा जास्त वय असलेल्या महिलांमध्ये 10 पैकी 5 महिलांचा गर्भपात होतो.

काय आहे गर्भपात होण्याचे लक्षणे?
ब्लीडिंग होणे किंवा कपड्यांवर पुसट किंव गडद रक्ताचे डाग दिसणे. पण लक्षात ठेवा प्रेग्नंसीमध्ये पहिल्या 3 महिन्यांमध्ये ब्लिडिंग होणे किंवा रक्ताचा डाग दिसणे नॉर्मल आहे. त्याला मिसकॅरेज समजणे चुकीचे आहे. पण असे झाल्यास डॉक्टरासोबत संपर्क साधा. तसेच पोटाच्या खालच्या भागात दुखणे किंवा पिळ पडल्यासारखे वाटणे. प्राईवेट पार्ट Fluid Discharge होणे, Tissue leakag होणे हे देखील मिसकॅरेजचे लक्षण असू शकते. जास्त काळापर्यंत प्रेग्नेंसींची लक्षण न जाणवणे देखील वॉर्निक साईन असू शकते.
Esakal