‘बिग बॉस मराठी ३’च्या घरात ‘चल रे भोपळ्या टुणूक टुणूक’ या कॅप्टन्सी कार्यादरम्यान बरेच वाद झाले.
टास्कदरम्यान घरातील काही सदस्यांनी नियमभंग केले. याचमुळे बिग बॉसने सदस्यांची कठोर शब्दांत कानउघडणी केली. विशाल, गायत्री आणि स्नेहा यांना त्याचे परिणामदेखील भोगावे लागले. बिग बॉसने जय, उत्कर्ष, विकास आणि आदिशला सक्त ताकीद दिली. ताकीद दिल्यानंतरही काही सदस्यांकडून नियमांची पायमल्ली करण्यात आली. बिग बॉसने अखेर विशाल, स्नेहा गायत्री यांना घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेसाठी थेट नॉमिनेट केलं. टास्कदरम्यान या तिघांनी धक्काबुक्की केली, घरातील सामानाचं नुकसान केलं. या सर्व घडामोडींनंतर मीराने गायत्रीसमोर तिचं मन मोकळं केलं. “नाही सहन होत,” असं म्हणत गायत्रीसमोर मीरा ढसाढसा रडली.