मुंबई: महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतातच सध्या सणासुदीचा काळ आहे. कोरोनाच्या निर्बंधांमधून लोकांची आर्थिक स्थिती आता कुठे सावरते आहे, त्यातचं महागाईनं लोकांचं कंबरडं मोडलं आहे. पेट्रोल-डिझेलचे दर सध्या विक्रमी पातळीवर आहेत. इंधनाचे दर वाढल्यामुळे एकूणच सर्व प्रकारच्या वस्तूंच्या किंमती महागल्या आहेत. पालेभाज्या आणि खाद्यतेलांच्या किंमतीमुळं सणासुदीच्या काळात महागाईनं लोकांचं जिनं मुश्कील केलं आहे.

हेही वाचा: महागाई भत्ता वाढला, लाखो केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी Good News

दिवाळीतील खर्च भागवणं मुश्कील

कोरोनाच्या काळात कामधंदे बंद झाल्याने लोकांची आर्थिक स्थिती बिकट तोलामोलाचीच आहे. त्यामुळे यंदाच्या दिवाळीत लोकांनी खर्चाला मुरड घालावी लागली आहे. यापूर्वी दिवाळीच्या काळात लोक ड्रायफ्रूट्सची मोठ्या प्रमाणावर खरेदी करायचे पण आता यामध्ये मोठी घट झाली आहे. ड्रायफ्रुट्सच्या वाढत्या किंमती आणि खिशात पुरेसा पैसा नसल्यानं लोकांवर ही वेळ आली आहे. त्याचबरोबर पावसामुळं तरकारी पिकांना बसलेला फटका त्यातचं महागाईत वाढ झाल्यानं सध्या पालेभाज्यांचे दर गगनाला भिडले आहेत. आजचा कोथिंबीरचा दर ५० ते ६० रुपये गड्डी, मेथी ४० रुपये गड्डी, टोमॅटो ८० रुपये किलो, कांदा ६० रुपये किलो, याप्रमाणे दर भरमसाठ वाढले आहेत. तर विविध खाद्यतेलांच्या किंमतीत गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढ झाली आहे. मात्र, काही दिवसांपूर्वी आयातीचे कर कमी केल्यानं तेलांच्या दरानं दिलासा दिला आहे. त्यामुळे खाद्य तेलाच्या १५ किलो/लिटरच्या डब्यामागे १५० रुपयांनी घट झाली आहे.

महागाई

महागाई

होम अप्लायन्सेसच्या किंमतीतही वाढ

दिवाळसणाला घरगुती वापरासाठीची एखादी मोठी वस्तू विकत घेण्याकडेही लोकांचा कल असतो मात्र, यंदा लोक हा खर्च टाळताना दिसत आहेत. कारण टीव्ही, फ्रीज, वॉशिंगमशीन या वस्तूंच्या किंमतींमध्ये गेल्यावर्षीच्या तुलनेत सुमारे १५ ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. मुंबईतील एका कन्सल्टन्सी फर्मने केलेल्या सर्व्हेक्षणात ही बाब समोर आलीए की, भारताची अर्थव्यवस्था आता कोरोनाच्या संकटातून हळूहळू पूर्वपदावर येत आहे. पण लोकांच्या घटलेल्या उत्पन्नामुळं अर्थव्यवस्थेचा वेग मंदावला आहे.

घरगुती उपकरणे

घरगुती उपकरणे

पेट्रोल-डिझेल, गॅसच्या दरात मोठी वाढ

गेल्यावर्षीच्या तुलनेत देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमतींत ३५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्याचबरोबर स्वयंपाकाच्या गॅसचे दर ५० टक्क्यांहून अधिक वाढले आहेत. अर्थतज्ज्ञांच्या मते यामुळं देशातील तीन चतुर्थांश लोकांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. छोट्या उद्योजकांचं म्हणणं आहे की, पेट्रोल-डिझेल आणि स्वयंपाकाच्या गॅसचे भाव वाढल्याने त्यांची कमाई कोरोना काळाच्या तुलनेत ३० टक्क्यांनी कमी आहेत. यामुळं घर चालवणं मुश्कील झालं आहे.

पेट्रोल डिझेलची किंमत

पेट्रोल डिझेलची किंमत

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here