नागपूर : आवळा हे अत्यंत आरोग्यदायी फळ आहे. आयुर्वेद तसेच युनानी या वैद्यकशास्त्रांमध्ये आवळ्याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. आवळ्याचा च्यवनप्राश आरोग्याच्या दृष्टीने लाभदायी ठरतो.

आवळ्यामध्ये ‘क’ जीवनसत्त्व आणि लोह यांचे प्रमाण भरपूर आहे.
आवळ्यात असणारे टॅनिन्स, फ्लेवोनाईडस्, सॅपोनन असे पोषक घटक शरीराची विविध कार्य सुरळीत ठेवण्यास मदत करतात. या घटकांमुळे शरीराची झीज भरून निघण्यास मदत होते.
बध्दकोष्ठता असणाऱ्यांना आवळा चूर्ण किंवा कच्चा आवळ्याच्या सेवनाने आराम मिळू शकतो.
आवळ्यातल्या फायबरमुळे पचनसंस्थेचे कार्य सुधारते तसेच पंचरसांनीयुक्त आवळा हा पचनसंस्थेतील आमाचा निचरा करून त्याची कार्यक्षमता वाढवतो.
मासिक पाळीचे काम केवळ प्रजोप्तादनच नाही तर विषारी घटक बाहेर टाकणे हेही असते. मासिक पाळी दरम्यान आवळ्यासह मंजिष्ठा, कडुनिंब व हळद यांचे चाटण स्वरूपात केल्यास आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत लाभदायी ठरते.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here