मुंबई – आपल्या हटक्या दिग्दर्शनामुळे जगभर प्रसिद्ध झालेल्या एस शंकर यांच्या जावयावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोहित दामोदरन असं त्यांच्या जावयाचे नाव असून त्यानं 16 वर्षाच्या मुलीवर शाररिक अत्याचार केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. एका अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. शंकर यांनी रोबोट आणि रोबोट 2 सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. रोहित दामोदरन यांची डोकेदुखी वाढली आहे. रोहित हे एक व्यावसायिक क्रिकेटपटू आहेत.

रोहितवर अशाप्रकारचे आरोप झाल्यानं त्याच्या चाहत्यांनाही धक्का बसला आहे. आता त्याच्याविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. याबाबत टाईम्स ऑफ इंडियानं दिलेल्या वृत्तानुसार, रोहितच्या विरोधात पॉक्सो अॅक्टच्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे प्रकरण दक्षिण भारतातील एका शहरात घडले होते. पीडीतानं याप्रकरणाची दखल क्रिकेट बोर्डाशी केली होती. मात्र त्यावेळी क्रिकेट क्लबनं त्या प्रशिक्षकाची माफी मागण्यास नकार दिला होता.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितानं पुद्दुचेरी बाल कल्याण समितीमध्ये जावून तक्रार नोंदवलीय. या प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर पदाधिकाऱ्यांना सेक्रेटरी वेंकट आणि आणखी जणांवर गुन्हे दाखल कऱण्यात आले आहेत. त्यात एस शंकर यांच्या जावयाचाही समावेश आहे. गुन्हे दाखल झाले असले तरी अद्याप या प्रकरणामध्ये कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. एस शंकर यांच्या मोठ्या मुलीचं ऐश्वर्याचं लग्न दामोदरनं यांच्याशी झालं होतं.

हेही वाचा: ‘प्रत्येक बातमी, ‘बातमी’ नसते, तुमच्यावरही आहे देवाचा कॅमेरा’

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here