येत्या २२ ऑक्टोंबरपासून महाराष्ट्रातील सिनेमागृहे सुरु होत आहेत. कित्येक महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर चित्रपट प्रेमींना त्यांचे आवडचे चित्रपट सिनेमागृहात जाऊन पाहता येणार आहेत. त्यातही अक्षय कुमारच्या चाहत्यांसाठी पुढील एक वर्ष पर्वणीच ठरणार आहे. त्याचे तब्बल ५ चित्रपट आगामी काळात प्रदर्शित होणार आहेत. जाणून घेऊया त्या चित्रपटांबद्दल…….

१.गोरखा-
देशासाठी आपले बलिदान देणाऱ्या सैनिकांबद्दल सर्वांना अभिमान वाटतो. त्यांच्या शौर्यकथा पाहताना देशप्रेमाने ऊर भरून येतो. भारतीय जवानांच्या अशाच एका शौर्यकथेवर आधारित गोरखा नावाच्या सिनेमाची घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटात अक्षय कुमार प्रमुख भुमिका साकारणार असून दिग्दर्शक-निर्माता आनंद एल्. राय हा आहे. भारतीय लष्कराच्या गोरखा रेजिमेंटचे (5th Gorakha regiment) मेजर जनरल इयान कार्डोझो यांच्या जीवनावर आधारित हे बायोपिक आहे..
२.राम सेतू-
अक्षय कुमारच्या आगामी बहूप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक म्हणजे ‘राम सेतू’ होय. हा चित्रपट प्रभू श्रीराम यांच्या आदर्शांवर आधारीत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक शर्मा यांनी केले असून अक्षय कुमारच्या केप ऑफ गुड फिल्म्सची निर्मिती आहे. यात जॅकलिन फर्नांडिस आणि नुशरत भरुचा यांच्याही भूमिका आहेत.
३.बच्चन पांडे-
फरहान सामजी दिग्दर्शित बच्चन पांडे या चित्रपटात अक्षय कुमार एका अशा गँगस्टरची भूमिका साकारत आहे, जो अभिनेता बनण्याची इच्छा बाळगतो. चित्रपटात क्रिती सॅनन एका पत्रकाराची भूमिका साकारत आहे पण तिला दिग्दर्शक बनायचे आहे. या चित्रपटात अक्षय एकदम हटके लूकमध्ये दिसत आहे. दाढी असलेला चेहरा, भितीदायक डोळे, कपाळाला बांधलेली बंदन आणि गळ्यात सोन्याची साखळी असा एखाद्या खऱ्या गँगस्टरला साजेसा त्याचा लुक आहे.
४.अतरंगी रे-
अतरंगी रे हा अक्षय कुमारचा आणखी एक बहुप्रतिक्षित चित्रपट आहे, ज्यात अक्षय कुमारसह सारा अली खान आणि धनुष हेही प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटातील अक्षयचा अवतार त्याच्या प्रत्यक्ष स्वभावापेक्षा फारसा वेगळा नाही. या विशिष्ट लुकमध्ये त्याने टोपी घातली असून त्याच्या चेहऱ्यावर स्मित हास्य दिसत आहे.

५.रक्षाबंधन-
या चित्रपटात अक्षय कुमार पातळ मिशीसह दिसणार आहे आणि त्याच्या लुकमध्ये फारसा बदल करण्यात आलेला नाही. यावर्षी रक्षाबंधनाच्या निमित्ताने अक्षय कुमारने त्याच्या या चित्रपटाची घोषणा केली होती. हा चित्रपट आनंद एल राय दिग्दर्शित आणि हिमांशू शर्मा लिखित हा चित्रपट त्याची बहीण अलकाला समर्पित केला आहे.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here