एनसीबीचे प्रमुख समीर वानखेडे आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्यात वाकयुद्ध रंगलं आहे. या सगळ्याची सुरुवात किंग खानचा मुलगा आर्यन खान याला क्रूझवरून अटक केल्यापासून सुरू झाली. आर्यनसोबत असलेल्या मित्रांकडे ड्रग्ज होते. आणि आर्यनही त्याचं सेवन करणार होता, असं एनसीबीने कोर्टात सांगितलं. या प्रकरणात समीर वानखेडे यांचीच भूमिका संशयास्पद असून त्यांचा बोलविता धनी वेगळा आहे, असा नवाब मलिक यांनी दावा केलाय.
या प्रकरणात वानखेडे यांची बहीण जॅस्मीन वानखेडे तसेच अन्य काहींचा सहभाग असल्याचा संशय मलिक यांना आहे. वानखेडे यांना पदावरून बडतर्फ करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिलाय. तसेच वानखेडे हे दुबई आणि मालदिवला गेले होते. यात दुबईमध्ये त्यांची काही जणांसोबत बैठक झाली, आणि त्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याचा दावा मलिक यांनी केलाय. वानखेडेंनी हे सारे आरोप फेटाळले. मात्र ते दुबई आणि मालदिवला गेल्याचे फोटो मलिक यांनी प्रसिद्ध केले आहेत. याच फोटोंमुळे मलिक आणि वानखेडे यांच्यातील वादाला फोडणी मिळाली आहे.

(सौजन्य – जॅस्मीन वानखेडे, इन्स्टाग्राम)

(सौजन्य – क्रांती रेडकर, इन्स्टाग्राम)

फोटो लिंक : https://www.instagram.com/p/CT4F6iRpHZz/
(सौजन्य – जॅस्मीन वानखेडे, इन्स्टाग्राम)

(सौजन्य – जॅस्मीन वानखेडे, इन्स्टाग्राम)

(सौजन्य – जॅस्मीन वानखेडे, इन्स्टाग्राम)
Esakal