ठाकरे सरकारचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आपल्या जावयाच्या जयोस्तूते मॅनेजमेंट प्रा. लि. कंपनीला १५०० कोटी रुपयांचे कंत्राट दिले होते. याची वैधता १० वर्षे होती. महाराष्ट्रातील २७००० ग्राम पंचायतीचे TDS रिटर्न पुढच्या १० वर्षांपर्यंत जयोस्तूते मॅनेजमेंट प्रा. लि. कंपनी फाइल करणार आणि त्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीला दरवर्षी जवळपास ५०,००० रुपये द्यावे लागणार होते. दर वर्षी जयोस्तूते मॅनेजमेंट कंपनीला यातून १५०० कोटींची आवक होणार होती.

कंत्राट रद्द झाल्याचा जीआर महाविकास आघाडी सरकारने काढला आहे.
भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी यासंबंधी तक्रार दाखल केली होती. तसेच त्यांनी माध्यमांसमोर हा विषय आणला होता. मुश्रीफ यांनी अपारदर्शकपणे १० मार्च २०२१ रोजी हे १० वर्षांचे कंत्राट दिल्याचे पुरावे सोमय्यांनी दिले होते. सप्टेंबर महिन्यात त्यांनी माहिती उघडकीस आणाली होती.
जयोस्तूते मॅनेजमेंट प्रा. लि. कंपनीची स्थापना २०१२-१३ मध्ये झाली. परंतु हसन मुश्रीफ यांचे जावई मतीन यांनी ही कंपनी ८ महिन्यांपूर्वीच विकत घेतली. मागील ८ वर्षात या कंपनीला काहीच आवक नाही. तसेच सन २०१९-२० मध्येही कंपनीची उलाढाल शून्य होती. यानंतरही संबंधित कंपनीला कंत्राट दिल्याने सोमय्या यांनी घोटाळा झाल्याचा आरोप केला.

कंत्राट रद्द झाल्यानंतर किरीट सोमय्या यांनी प्रेसनोट जारी केली.
Esakal