नवी दिल्ली : कोरोनाविरोधातील लढाईमध्ये आज भारताने मोठी बाजी मारली. देशातील लसीकरणाने शंभर कोटींचा ऐतिहासिक टप्पा गाठला. या ऐतिहासिक क्षणी देशभर उत्सवी वातावरण पाहायला मिळाले. दिल्लीतील संसद भवनाची इमारत रोषणाईने उजळून निघाली होती तर वारसास्थळी रांगोळ्या काढून, रुग्णालये आणि लसीकरण केंद्रांमध्ये मिठाईचे वाटप करून लोकांनी आनंद व्यक्त केला.

हे देखील वाचा: 100 कोटी डोस : थरुरांकडून सरकारचं कौतुक, काँग्रेसनं सुनावलं
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीय, आरोग्य सेवक, कोरोना योद्धे आदींना शुभेच्छा दिल्या. भारतीय विज्ञान, कार्यक्षमता व १३० कोटी भारतीयांच्या सामूहिक भावनेचा हा विजय असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आमचे डॉक्टर, परिचारिका, आरोग्य कर्मचारी व हे लक्ष्य साध्य करण्यात आपापले योगदान देणाऱ्या सर्वांचे आभार अशी भावना मोदींनी व्यक्त केली.
भारताने आज १०० कोटी लसीकरणाचा टप्पा पुर्ण केला आहे . या अभूतपूर्व ऐतिहासिक क्षणी नरेंद्र मोदी यांनी स्वतःचा प्रोफाईल फोटो फेसबुक वरून हटवला आहे. फेसबुक प्रोफाईल बदलून देशाचे अभिनंदन करणारी पोस्ट केली त्यांनी केली आहे. या ग्राफिक फोटो मध्ये त्यांनी ‘भारताचे अभिनंदन १०० कोटी लसीकरणाचे डोस पुर्ण’ अशा आशयाची पोस्ट’त्यांनी टाकली आहे. फेसबुक पोस्ट खाली भारतीयांनी नरेंद्र मोदींचे अभिनंदन करणाऱ्या कंमेंट केल्या आहेत.
Esakal