आपल्या दररोजच्या जेवणात अनेक पदार्थ असतात. या पदार्थांची चव वाढवण्यासाठी विविध मसाल्यांचा वापर केला जातो. खरंतर जस जसा या मसाले पदार्थांचा शोध लागला तसा त्यांचा वापर होऊ लागला. मात्र, हा वापर करत असताना पूर्वजांनी त्याचे औषधी गुणधर्मसुद्धा ओळखले होते. त्याचा फायदा जेवणातूनच उपचार व्हायला लागले. फक्त चवीसाठी मसाल्यांचा वापर होतो असं नाही तर औषध म्हणूनही होतो. मसाले जेवणाला टेस्टी बनवतातच पण त्यासोबत शरीर निरोगी ठेवण्यासही मदत करतात. याबाबत आता हर्बल आणि भारतीय मेडिसिन रिसर्च लॅबोरेटरीने संशोधन केलं आहे. चेन्नईच्या श्री रामचंद्र विद्यापीठातील बायोकेमिस्ट्री विभागात हे संशोधन झालं. यामध्ये भारतीय मसाले हृदयासाठी कसे आरोग्यदायी आहेत ते शोधण्यात आले. हन्नाह आ वासंती आणि आर पी परमेश्वरी यांनी हा संशोधन प्रबंध सादर केला आहे.

फक्त चवीसाठी नाही तर औषधी गुणधर्मही

मसाले हे फक्त पदार्थाची चव वाढवण्यासाठी नाहीत. काही पदार्थांसाठी मसाले गरजेचे असतात. याचं प्रमाण वेगवेगळं असू शकतं. गोड आणि तिखट पदार्थांसाठी वेगळ्या प्रकारचे मसाले असतात. गोड पदार्थांमध्ये वेलची किंवा केशर घातले जाते. तर तिखट पदार्थांमध्ये गरम मसाल्यांचा समावेश असतो. भारतीय डिशमध्ये भारतीय मसाले नसतील तर ती परिपूर्ण म्हणता येणार नाही. त्यात आल्ले, लसूण, वेलची, मिरेपूड, जिरे, धने इत्यादी मसाले पदार्थ असतात.

सध्या थंडीचे दिवस आहेत. या दिवसात चहा पिणाऱ्यांचं प्रमाण जास्त असतं. त्यात भारतात घरांमध्ये आल्लं घातलेला चहा मिळतोच. इतकंच काय तर मांसाहारी जेवण, चिकन-मटण करतानासुद्धा याचा वापर केला जातो.

मसाल्यांमध्ये औषधी गुणधर्म असतात असं मानलं जातं. मसाल्यामुळे भूक शमते असं नाही. आयुर्वेदात मसाल्यांचा उल्लेख औषधं असा आहे. अनेक जडी बूटी आणि मसाल्यांना मोनोग्राफमध्ये समाविष्ट करण्यात आलं होतं. यात वेलची, दालचिनीची साल, लवंगा, धने, बडीशेप, बडीशेप, लसूण, आस्से, पुदीना, कांदा, पेपरिका, ओवा यांचा समावेश आहे. तसंच हळदी, मोहरी हेसुद्धा त्यामध्ये आहे.

मसाले आणि त्यांचे फायदे

लसूण –हृदय व रक्त वाहिन्यांवर चांगले आणि वाईट परिणाम करणारे काही पदार्थ असतात. त्यात प्रामुख्यानं फळे, औषधी वनस्पती, मसाले यांचा समावेश असतो. त्या सर्वांमध्ये असणारा एक पदार्थ म्हणजे लसून. याच्या सेवनाने हृदय आणि रक्तवाहिन्यांशी संबंधित आजारांचा धोका कमी संबवतो. कोलेस्ट्रॉल, एलडीएळ, ऑक्सिडेशन, प्लेटलेट इत्यादींची वाढ कमी करते. तसंच ऑक्सिडाइज्ड एरिथ्रोसाइट्स आणि एलडीएलचे पॅरोक्सीडेशनसुद्धा रोखण्याचं काम लसूण खाल्ल्याने होते. सायनसमध्ये होणाऱ्या फॅटी स्ट्रिक्सच्या निर्मितीला रोखण्याचं कामही लसणामुळे होते. अन्नात लसणाचा वापर केल्यास कोलेस्ट्रॉल कमी होते आणि अँटिऑक्सिडेंट प्लेटलेटचं एकत्र होण्याचं प्रमाण घटतं. तसंच उच्च रक्तदाब कमी होतो आणि अँटिऑक्सिडेंटमध्ये वाढ होते.

हळदी – हळदीचा औषध म्हणून मोठ्या प्रमाणावर वापर होते. भारत आणी चिनी औषधांमधे हळद ही पोटदुखी, दात दुखी, छातीत दुखत असल्यास, तसंच मासिक पाळीच्या त्रासावर उपचारासाठी वापरण्यात येते. दाह कमी करण्यासाठी हळदीचा प्रामुख्याने वापर होतो. पोट आणि यकृताचे त्रास असतील तर त्यात हळद औषधाचं काम करते. जखम बरी होणयासाठी तसंच कॉस्मेटिक म्हणूनही हळदीचा वापर करण्यात येतो. हळदीच्या वापराने ४ आठवड्यात एचडीएल कोलेस्ट्रॉल वाढवते आणि कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराइडचं प्रमाण कमी होते. मधुमेह, मुत्रपिंडाचा त्रास असलेल्यांसाठीसुद्धा हळद उपयुक्त ठरते. मायोकार्डियल इन्फेक्शन आणि फुफ्फुसाचा आजा इत्यादी आजारांवर हळदीचा उपचार प्रभावी ठरतो असं अभ्यासातून समोर आलं आहे.

आले कोरोनाव्हायरस

आले कोरोनाव्हायरस

गल्ली – अदरक किंवा आल्ले हे हर्बल औषधांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरण्यातय येतं. संधिवात, स्नायुदुखी, घशात खवखवणे, बद्धकोष्ठता, अपचन, रक्तदाब, संसर्गजन्य आजार इत्यादींवर आल्ले गुणकारी ठरते. आल्ले खाल्ल्यानं रक्त प्रवाह योग्य होण्यास आणि वेदना कमी होण्यासाठी मदत करते. हृदयरोग, कॅन्सर, अल्झायमर सारख्या आजारांमध्येही ते उपुयक्त ठरत असल्याचं संशोधकांनी म्हटलं आहे.

हेही वाचा: गृहिणींमध्ये वाढतोय मानसिक तणाव, आनंदी राहण्यासाठी या 5 टिप्स

काळी मिरी – अँटिऑक्सिडेंट आणि बॅक्टेरियांची वाढ रोखण्यात काळी मिरी उपयुक्त ठरते. तसंच पचनासाठी आणि वजन कमी करण्यास याची मदत होते. चरबीच्या पेशींचे विघटन होण्यासाठी काळी मिरी उपयोगी ठऱते. यात व्हॅनेडियम असल्यानं हृदयविकाराच्या झटक्याचा त्रास असलेल्यांना फायदा होतो. हृदय निरोगी राखण्यात काळी मिरी मदत करते असं संशोधनात आढळून आल्याचं म्हटलं आहे.

निष्कर्ष

भारत हा विविधतेने नटलेला देश असून देशातील विविध भागात वेगवेगळ्या प्रकारचे मसाले आहेत. त्यांचा रोजच्या आहारात वापर होते. यात लसूण, मिरेपूड, धने, आल्ले, हळद इत्यादी मसाले वापलले जातात. यामुळे जेवणाची चव वेगळी होते. वैज्ञानिक पुराव्यांमधून असं दिसत आहे की, मसाल्यांच्या पदार्थांमुळे हृदय रोगाच्या रुग्णाला फायदा होता. हृदय निरोगी राखण्यास मदत होते असा निष्कर्ष संशोधनातून काढण्यात आला आहे.

(टीप – वरील लेखातील माहिती ही संशोधकांनी काढलेल्या निष्कर्षानुसार आहे. मात्र आरोग्याशी संबंधित तक्रारी आणि आहार याबाबत तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ला घ्यावा.)

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here