नवी दिल्ली : भारताने १०० कोटी कोविड लसीकरणाचा टप्पा पार केल्यानिमित्त गुरवारी भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाने आयोजिक उपक्रमाअंतर्गत भारतातील 100 स्मारके राष्ट्रीय ध्वजाच्या रंगांनी प्रकाशित करण्यात आली.







पश्चिम बंगाल : कोलकातामध्ये मेटकाफ हॉलला तिरंग्याची रंगात रोषणाई करण्यात आली होती.

तेलंगणा : हैदराबादमध्ये चारमीनार ध्वजातील तीन रंगाची रोषणाई केली होती.

औरंगाबाद: औरंगाबादमधील बीबी का मकबरा तिरंगी दिव्यांची रोषणाई करण्यात आली होती.

महाराष्ट्र: पुण्यातील शनिवारवाडा किल्ला तिरंग्याच्या रंगांची रोषणाईमध्ये उजळला होता.


नवी दिल्ली: सफरचंदजंग मकबरा येथे तिरंगी रंगाच्या दिव्यांची रोषणाई केली होती.

नवी दिल्ली : 100 कोटी लसींकरणाचा टप्पा पार केल्याप्रकरणी नवी दिल्लीतील IGI Aiport येथे गुरुवारी स्पाईसजेटच्या विशेष विमान निर्मितीच्या अनावरण करण्याच आले यावेळी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री मनसुख मांडविया, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ.भारती प्रवीण पवार, स्पाइसजेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय सिंह उपस्थित होते.
Esakal