म्हसरूळ (नाशिक) : पंचवटीतील कुमावतनगर येथे शुक्रवार (ता.२२) रोजी पहाटे साडेसहाच्या सुमारास गॅस गळती होऊन सिलेंडरचा स्फोट ( Gas leak and cylinder explosion) झाल्याची घटना घडली आहे. या स्फोटात एकाच घरातील सहा व्यक्ती गंभीर जखमी झाल्याचे समजते. हे जखमी परराज्यातील असून मोलमजुरीनिमित्त गत दहा ते बारा वर्षांपासून नाशिकमध्ये स्थायिक आहेत.
गॅस गळती झाल्याने गॅसचा भडका
याबाबत अधिक माहिती अशी की, पंचवटीतील पेठरोडवरील कुमावतनगर येथे टाईल्सचे काम करणारे परराज्यातील पाच ते सात जण राहतात. गुरूवार (ता.२१) रोजी रात्री घरातील या सदस्यांकडून गॅस व्यवस्थित बंद करण्याचे राहून गेले होते. शुक्रवार (ता.२२) रोजी सकाळी साडेसहा ते पावणे सातच्या दरम्यान टाइल्सची काम करणाऱ्या एकाने सकाळी माचिसने बिडी पेटवली असता रूममध्ये गॅस गळती झाल्याने गॅसचा भडका झाला. या भडक्यात लवलेश धरम पाल (रा.अलादात पूर, जिल्हा उत्तर प्रदेश), अखिलेश धरंपाल (रा. सदर),विजयपाल फत्तेपूर (उत्तर प्रदेश), संजय मौर्य (रा. अलादात पूर फतेहपुर, उत्तर प्रदेश), अरविंद पाल (रा. इसापूर फतेहपुर, उत्तर प्रदेश), वीरेंद्र कुमार (रा. बारमपूर, फतेहपुर, उत्तर प्र) अशी नावे आहेत. जखमींना जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचा: मुश्रीफांच्या जावयाचा कोट्यावधींचा Contract अखेर रद्द – सोमय्या
हेही वाचा: नाशिक : विनाहेल्मेट शासकीय कार्यालयात ‘नो एन्ट्री’
Esakal