रानडुक्कर, वानर, केलटी या जंगली श्वापदांचा उपद्रव होत असल्याने शेतात मचाण बांधून २४ तास घरच्यांच्या मदतीने पहारा सुरू आहे.

मंडणगड : तालुक्यात भाजीपाला, मत्स्यशेती, फळबाग लागवड असे कृषिक्षेत्रात विविध प्रयोग करण्यात येत आहेत. त्यातच यावर्षी भात लागवडीत वेगळ्या प्रयोगाची भर पडली आहे. सावरी गावातील अमोल तांबे या तरुणाने जगातील सर्वांत महागडा समजला जाणारा व खाण्यासाठी अत्यंत उपयुक्त असणाऱ्या काळ्या तांदळाची शेती केली आहे. एका बाजूला स्पर्धा परीक्षेची तयारी आणि दुसऱ्या बाजूला त्याने केलेला नाविन्यपूर्ण प्रयोग शेतात डोलणारे हे पीक पाहून यशस्वी झाल्याचे सांगत आहे.

चिपळूणमध्ये डीबीजे महाविद्यालयात बीएस्सी केल्यानंतर यूपीएससी परीक्षेची तयारी करतो आहे. लॉकडाउन काळात घरात बसून काय करावे, ही चिंता सतावत होती. पारंपरिक शेतीतून शेतकऱ्यांना मिळणारे उत्पन्न व खर्चाची सांगड याची माहिती घेऊन परिसरातील शेतकऱ्यांना व्यावसायिक शेती करण्याच्यादृष्टीने प्रवृत्त व्हावे, म्हणून वेगळी वाट निवडली. सेंद्रिय पद्धतीने बाजारात मोठी मागणी असणाऱ्या काळ्या तांदळाची शेती करण्याचा निर्णय करून त्यासाठी चॅक हाऊ नावाचे बियाणे आसाममधून पोस्टाने मागवले.

हे देखील वाचा: २५ हजार कोटीचा भ्रष्टाचार झाला हा खोटा आरोप – अजित पवार

१३ जूनला १५ गुंठे क्षेत्रावर काळ्या भाताची पेरणी केली. शेणखत, जीवामृताचा व गिरीपुष्प झाडाचा पाल्याचा वापर केला. यासाठी त्याला बीएस्सी अॅग्रिकल्चर अजिंक्य रुके या मित्राचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. १४० दिवसांनी आता शेतात पीक तयार असून लवकरच त्याची काढणी करण्यात येणार आहे. रानडुक्कर, वानर, केलटी या जंगली श्वापदांचा उपद्रव होत असल्याने शेतात मचाण बांधून २४ तास घरच्यांच्या मदतीने पहारा सुरू आहे.

भोळवलीत एकत्रित काळ्या तांदळाची शेती

तालुक्यातील भोळवली येथेही गावातील तरुणांनी एकत्रित ४० गुंठे जागेवर काळ्या तांदळाची शेती केली आहे. शांताराम सुगदरे, भावेश सुगदरे, सुनील घाडगे, संदेश सुगदरे, श्रीकांत कदम यांनी सरपंच रणजित कासारे यांच्या सहकार्याने व अभिषेक सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली काळा तांदूळ पिकवला आहे. त्यामुळे उशाला धरण असणाऱ्या गावाला एक चांगला पर्याय ठरणार आहे.

हे देखील वाचा: ‘गोबर रिपब्लिक’मध्ये राहता, महुआ मोईत्रा शिक्षण धोरणावर संतापल्या

एक दृष्टिक्षेप..

* संपूर्ण शेत काळ्या लोंब्यांनी बहरले

* शरीरातील दूषित घटक स्वच्छ करण्यास उपयुक्त

* हृदयविकारावर फायदेशीर

* तीनशे ते पाचशे रुपये किलो दराने विक्री

* परदेशातही मोठी मागणी

* पौष्टिक व बलवर्धक तांदूळ

हे बघा..

  • १३ जूनला १५ गुंठे क्षेत्रावर भाताची पेरणी

  • १४० दिवसांनी आता शेतात पीक तयार

  • शेतात मचाण बांधून २४ तास पहारा

हे देखील वाचा: संजय राऊतांना लसीकरणाच्या 100 कोटींच्या आकड्याबद्दल शंका!

“शेतकऱ्यांनी व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून शेती करणे अनिवार्य आहे. फक्त पोटापुरते धान्य न पिकवता त्याला व्यापाराची जोड द्यावी. शेतीत विविध प्रयोग करून जमिनीच्या पोतप्रमाणे पर्याय निवडणे अपेक्षित आहे. काळ्या तांदळाला मोठी मागणी असल्याने त्याची लागवड आर्थिक फायदा देऊ शकते.”

– अमोल तांबे, सावरी

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here