पतीला दीर्घायुष्य लाभावं आणि त्याचं कल्याण व्हावं म्हणून हिंदू धर्मातील पत्नी अनेक उपवास करत असतात. परंतु करवा चौथं व्रत अत्यंत विशेष मानले जाते. या वर्षी, करवा चौथचा उपवास रविवारी, २४ ऑक्टोबर रोजी साजरा केला जाईल. या दिवशी स्त्रिया त्यांच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी निर्जल उपवास करतात. यानंतर, रात्री पूजा केल्यावर आणि चंद्राला अर्घ्य दिल्यानंतर, आपल्या पतीच्या हाताने पाणी पिऊन त्या उपवास सोडतात. भारतात मुख्यत्वे राजस्थान, उत्तरप्रदेश, गुजरात, हरियाणा,हिमाचल प्रदेश, मध्यप्रदेश, पंजाब या राज्यांमध्ये हे व्रत विवाहित महिला दरवर्षी करतात. या उपवासाच्या दरम्यान स्त्रिया त्यांच्या उपवास आणि उपासनेशी संबंधित प्रत्येक गोष्टीची काळजी घेण्याचा प्रयत्न करतात, परंतु पतीनेही काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक बनते. कारण असे न केल्यास पत्नीच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात. कदाचित तिला रागही येऊ शकतो. चला, आज जाणून घेऊया करवा चौथच्या दिवशी पतीने कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी.
हेही वाचा: करवा चौथला खुलवा सौंदर्य; 15 मिनिटात मिळवा ग्लोइंग स्कीन

पतीने हे लक्षात ठेवले पाहिजे की, जेव्हा पत्नी उपवास करत असते, तेव्हा कोणत्याही परिस्थितीत त्याने तिच्या समोर खाण्यापिण्याचा उल्लेख करू नये. यामुळे पत्नीला समजते की, पती तिच्या उपवासाची काळजी करत नाही. तिला असे वाटते की तिचा नवरा मुद्दाम हे करता आहे. अशा परिस्थितीत तुमच्या पत्नीच्या भावना दुखावल्या जाऊन ती तुमच्यावर रागावू शकते.
पत्नी पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि आरोग्यासाठी मोठ्या श्रद्धेने आणि विश्वासाने उपवास करते. अशा स्थितीत पतीने हे लक्षात ठेवले पाहिजे की, विनोद करताना उपवास तसेच वजन कमी करण्याबद्दल बोलू नका.
कित्येकदा कुठेतरी बाहेर जाताना किंवा कामावरून घरी परत येताना पत्नी पतीची बराच काळ वाट पाहते. परंतु आपण करवा चौथच्या दिवशी हे करणे टाळावे. पत्नीच्या उपवासाचा आदर करा आणि वेळेवर पोहोचा. त्यांना जास्त प्रतिक्षा करायला लावू नका.
सहसा, तुम्ही तुमच्या पत्नीची स्तुती करण्यास टाळाटाळ करू शकता, पण करवा चौथदिवशी असे करू नका. या दिवशी पत्नी तुमच्यासाठी नटून बसलेली असते, कोणत्याही मेजवानीसाठी नाही. कित्येक दिवस ती काय परिधान करायचे आणि कसे सजायचे याचे नियोजन करते. त्यामुळे अशा परिस्थितीत ती तुमच्याकडून अशी अपेक्षा करू शकते की, तुम्ही तिच्या स्तुतीसाठी काही शब्द बोला. म्हणून तुम्ही या दिवशी त्यांच्या अपेक्षेनुसार जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
हेही वाचा: करवा चौथ का करतात? जाणून घ्या कारण
Esakal