मराठमोळी अभिनेत्री सायली संजीव हिची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे. गेल्या काही दिवसांपासून तिचे नाव क्रिकेटपटू ऋतुराज गायकवाडसोबत जोडले जात आहे. सायलीने नुकतेच फोटोशूट केले असून तिच्या फोटोंवर नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट्स केल्या आहेत.

सायलीच्या इंस्टाग्रामवरील फोटोवर ऋतुराजने केलेल्या एका कमेंटनंतर या दोघांच्या चाहत्यांमध्ये त्याची चर्चा सुरू झाली.
सायलीच्या प्रत्येक फोटोवर ऋतुराजशी संबंधित कमेंट केल्या जात आहेत.
नुकतेच तिने इंस्टाग्रामवर साडीतील फोटो पोस्ट केले आहे. त्यावर एका चाहत्याने लिहिलं, ‘बघावं अन् बघतंच राहावं, सॉरी ऋतुराज.’
तर काहींनी ऋतुराणी, गायकवाड वहिनी, ऋतुराजची राणी, परमसुंदरी अशाही कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
सायलीला ‘काहे दिया परदेस’ या मालिकेतून प्रसिद्धी मिळाली.
तिने पोलिस लाईन, आटपाडी नाईट्स, एबी आणि सीडी, सातारचा सलमान, गोष्ट एका पैठणीची आणि बस्ता या चित्रपटांत काम केलं आहे.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here