सिन्नर (जि. नाशिक) : वावी परिसरातील दुशिंग वाडी शिवारात सेवानिवृत्त शिक्षक रामनाथ ढमाले यांच्या शेतातील बांधावर लावलेली दहा वर्षांपेक्षा अधिक वयाची चंदनाची दहा झाडे दोन-तीन दिवसांपूर्वी अज्ञात चोरट्यांनी कापून नेल्याचा उघडकीस आला आहे. शेतमालक ढमाले सकाळी शेताकडे चक्कर मारण्यासाठी गेले असता त्यांना बांधावरील चंदनाची झाडे गायब असल्याचे आढळून आले. खोडाचा भाग कापून चोरट्यांनी लाकूड काढून नेले, तर फांद्या शेतातच बाजूला पडल्या होत्या. वावी पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता दोन दिवसांपूर्वी चंदनाच्या लाकडांसह पकडलेल्या एका महिलेकडे संशयाची सुई फिरत असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.
हेही वाचा: Nashik | गॅस गळतीमुळे सिलेंडरचा स्फोट, 6 गंभीर जखमी

खोडाचा भाग कापून घेत चोरट्यांनी दहा वर्ष जुनी झालेली झाडे लांबवली

चोरट्यांनी चंदनाचे लाकूड काढून नेले. तर फांद्या शेतातच
एका बाजूला टाकून दिल्या.

वावी पोलिसांकडून घटनास्थळाची पाहणी करून तपास सुरू केला आहे. प्राथमिक दृष्ट्या दोन दिवसांपूर्वी चंदनाच्या लाकडांसह पकडलेल्या महिलेकडे संशयाची सुई फिरत आहे.

हेही वाचा: ‘BOSCH’ च्या 730 कामगारांना ब्रेक; तर 530 जणांना व्हीआरएस
Esakal