या जगात अगदी मोजके लोक आहेत, ज्यांना स्वादिष्ट अन्नाचा मोह होत नाही. चांगल्या स्वादिष्ट जेवणात कोणालाही आनंद देण्याची, तृप्त करण्याची क्षमता असते. हे खरंय की बॉलीवूड कलाकारांना आहाराचे काटेकोरपणे पालन करावे लागते, पण काही वेळा ते त्यांच्या मनाचे ऐकतात आणि मनसोक्तपणे पदार्थांचा आनंद लुटतात. आज आम्ही कार्तिक आर्यनबद्दल बोलणार आहोत. जर तुम्ही त्याचे इन्स्टाग्रामवरचे फोटो स्क्रोल केले, तर तुमच्या लक्षात येईल की, या अभिनेत्याला खायला खूप आवडते. आज आम्ही त्याचे असे फोटो तुमच्यासमोर आणणार आहोत, जे सिद्ध करतील की तो खरंच Foodie आहे.

या फोटोत कार्तिकच्या हातात सोयाबीनने भरलेलं वाडगं असल्याचे दिसतं. मात्र त्याचे कॅप्शन दुसरेच काहीतरी सांगते. त्याने इन्स्टाग्रामवर लिहिले आहे, “थिएटर खुले रहे है सुनते ही पॉपकॉर्न तैयार.” परंतु काहीही म्हणा, त्याच्या हातातील हे स्वादिष्ट सोयाबीन फक्त शोसाठी नसणार आहे, फोटो काढून झाल्यावर त्याने त्याच्यावर ताव मारला असणार हे नक्की.

या चित्रात कार्तिकच्या पुढे टेबलभर विविध अन्नपदार्थ दिसत आहेत. त्याची थाळी वेगवेगळ्या प्रकारची करी, डाळ, भात, पापड, लोणच्याने भरलेली दिसते. जिलेबीने भरलेली एक प्लेटही त्याच्या समोर आहे. याशिवाय वेगवेगळ्या भाज्यांच्या आणखी २-३ वाट्या असून तो या सगळ्याचा आनंद घेत असल्याचे दिसत आहे. त्यानं या फोटोला कॅप्शन दिलंय, “ये तो सिर्फ स्टार्टर है #Freddy ‘s diet..”

एकीकडे कार्तिक आर्यन मनसोक्त जेवतो, पण त्याच वेळी आपल्या आहाराचं संतुलन कसे राखावं, हे त्याला चांगले माहित आहे. या फोटोत आपल्याला त्याच्यासमोर फळांची सॅलेड असलेली डिश दिसत आहे. तो मनसोक्तपण खाताना दिसतोय. त्याने या फोटोला कॅप्शन दिलंय, “आज ब्रेकफास्ट में सब्र का फल खाया, आप लोगों ने क्या खाया?”

आपल्यापैकी बहुतेकांप्रमाणेच कार्तिक आर्यनसुद्धा लॉकडाऊनमध्ये मन्चिंग आणि स्वयंपाकाच्या कार्यात गुंतला होता. या फोटोत त्याने आपल्या बहिणीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी केक बनवला आहे, असे सांगितले.

खाओ और खिलाओ! –
कार्तिक आर्यनला फक्त एकट्याने खायला आवडत नाही, त्याला आपल्या सहकलाकारासोबत हा आनंद शेअर करायला आवडतं. सारा आणि कार्तिक हे लव्ह आज कल या चित्रपटाचे शूटिंग करत असतानाचा हो फोटो आहे. यावरुन आपण पाहू शकतो की, चित्रपटाचे शुटींग करतानाही तो जेवणाचा आनंद लुटतो. खरं तर, तो साराला त्याच्या हातांनी भरवत असल्याचं दिसत आहे.
Esakal