फुरसुंगी – पुणे महानगरपालिकेकडून उरुळीतील मंतरवाडी- हंडेवाडी रोडवरील जवळपास एक एकर जागेतील अनधिकृत बांधकाम पाडण्यात आले. या ठिकाणी ‘न्यू फॅशन मार्केट’ नावाने नवीन व्यापारी संकुल बनवण्यात आले होते. ‘शेती ना विकास झोन’ असलेल्या जागेवर उभारलेल्या या संकुलात दोनशे ऐंशी दुकाने होती. यासाठी कोणतीही परवानगी घेतली गेली नव्हती. या संदर्भात जागा मालकाला आठ दिवसांपूर्वी संबंधित बांधकाम काढण्यासाठी नोटीस देऊनही त्यांनी बांधकाम न काढल्याने कारवाई करण्यात आली. असे कार्यकारी अभियंता राहुल साळुंखे यांनी सांगितले.

कोरोना काळात कारवाई होत नसल्याने याकाळात बांधकाम करण्यात आले असल्याचे महापालिकेच्या सर्वेक्षणामध्ये आढळून आले, असेही त्यांच्याकडून सांगण्यात आले. दोन जेसीबी, दोन गॅसकटर, दहा बिगारी अशा फोजफाट्यासह ही कारवाही करण्यात आली. येथील ही पहिलीच मोठी कारवाई आहे. कार्यकारी अभियंता राहुल साळुंखे, उपअभियंता हनुमान खलाटे, बांधकाम निरीक्षक अनुप गजलवार, राहुल शर्मा, लोणी पोलीस स्टेशनचे सहा. उप निरीक्षक निकेतन निंबाळकर आणि पोलीस कर्मचारी यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली.
Esakal