नाशिक : कोरोनामुळे (Corona) बंद असलेली नाट्यमंदिरे उघडण्यास सरकारची परवानगी मिळाल्याने रंगकर्मींच्या आनंदाला उधाण आले आहे. शहरतील महाकवी कालिदास कला मंदिर आणि परशुराम सायखेडकर नाट्यमंदिरात रंगकर्मींंनी रंगदेवता नटराज, रंगभूमी पुजन करून उत्साहात आणि जल्लोषात पडदा उघडण्यासाठीची तिसरी घंटा वाजवली. आता लवकरच रंगभू्मीवर आपली कला सादर करण्यासाठी कलावंत उत्सुक आहेत.
या प्रसंगी अभिनेते दिपक करंजीकर, विद्या करंजीकर, डॉ. अनिरुध्द धर्माधिकारी, सुनिल ढगे, मुकुंद कुलकर्णी, विवेक गरुड, इश्वर जगताप, स्वप्निल तोरणे, मोहन उपसनी, सुनिल देशपांडे, आनंद ढाकीफळे, उमेश गायकवाड, माधुरी कुलकर्णी, आदी उपस्थीत होेते.
हे देखील वाचा: नाशिक : सत्ता बदलली, मात्र समस्या ‘जैसे थे’







हे देखील वाचा: तिसरी घंटा वाजली आणि गहिवरून आलं
Esakal