“पंतप्रधान रामबाण सुरक्षा योजनेतून मला ४००० मिळाले, आपणही रजिस्ट्रेशन करा” असा मेसेज जर आपल्या व्हाट्सअॅप किंवा कोणत्याही सोशल मीडियावरून आला असेल तर सावधान!

फेसबुक, व्हॉट्सअॅप किंवा इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आजकाल फेक न्यूजचा पूर आलेला दिसता आहे. सरकारच्या योजनांच्या नावाखाली बेरोजगारी भत्ता, मोफत रिचार्ज मिळवण्याच्या लिंक सध्या प्रचंड व्हायरल होता आहेत. आपल्या मोबाईलवरही ही लिंक आली असेल, तर सावध व्हा. सध्या असाच एक मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ‘प्रधानमंत्री रामबन सुरक्षा योजने’अंतर्गत, कोरोनाव्हायरसच्या मोफत उपचारांसह, केंद्र सरकार सर्व तरुणांना 4000 रुपयांची मदत देत असल्याचा दावा या मेसेजमध्ये करण्यात आला आहे.

फेक न्यूज

फेक न्यूज

सोशल मीडियावर आलेल्या अशा कोणत्याही मेसेजवर विश्वास ठेऊन लिंकवर क्लीक करण्याआधी सावध व्हा. भारत सरकारकडून अशी कोणतीही योजना चालवली जात नसल्याचे सिद्ध झाले आहे. पंतप्रधान रामबाण सुरक्षा योजनेसाठी रजिस्ट्रेशन सुरु आहे. या योजने अंतर्गत युवकांना ४००० रुपये मिळणार असल्याचा दावा करणारा एक मेसेज आणि त्यासोबत असलेली ती लिंक पूर्णपणे खोटी आहे.

फेक न्यूज

फेक न्यूज

फेक न्यूज

फेक न्यूज

या लिंकवर गेल्यावर काही कमेंट दिसतात ज्यामध्ये आम्हाला मदत मिळाल्याचा उल्लेख करण्यात आला. यापूर्वी हे देखील व्हायरल झाले होते की ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळाल्याच्या आनंदात मोदी सरकार सर्व नागरिकांना 12 महिन्यांची मोफत रिचार्ज करण्याची संधी देत ​​आहे.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here