पारोळा ः ज्याप्रमाणे चोपडा तालुक्यातील मसाका (Masca Sugar Factory) दिवाळीनंतर सुरू होत आहे. त्याप्रमाणे ‘वसाका’ च्या नियोजनपूर्वक अभ्यास करून डॉ. सतीश पाटील यांच्या मध्यस्थीने सुरु करण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांनी आज दिले. पारोळा भेटी प्रसंगी ते यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी बोलत होते.
हेही वाचा: गिरीश महाजनांना पैशांचा घमेंड,फोडाफोडीचे करतात राजकारण-रोहित पवार
यावेळी माजी खासदार वसंतराव मोरे, माजी पालकमंत्री डॉ. सतीश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, जि. प. सदस्य रोहन पाटील, नगरसेवक रोहन मोरे, जि प सदस्य हिंमत पाटील,कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक पराग मोरे,तालुकाध्यक्ष यशवंत पाटील तालुका युवक अध्यक्ष योगेश रोकडे, जिल्हा चिटणीस डॉक्टर शांताराम पाटील, जिल्हा चिटणीस डॉक्टर मनोराज पाटील, माजी प्राचार्य उल्हासराव पवार,पंचायत समितीच्या माजी सभापती रेखा पाटील, वर्षा पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील,महिला तालुकाध्यक्ष सुवर्णा पाटील, सुनंदा शेंडे ,सुवर्णा महाजन, कल्याणी देवरे,समता परिषदेचे संतोष महाजन,चोरवड सरपंच राकेश पाटील, ग्रंथालय सेलचे प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील, मन्साराम चौधरी, वना महाजन, दौलत राव पाटील, दिलीप पाटील, लोकेश पवार, अमित पाटील, डॉक्टर राहुल कुवर, राजेंद्र शिंदे एरंडोल, कोमल पाटील, अनिकेत भोई ,बंटी पाटील, अभिषेक पाटील,बारामती चे रोहन कलहटकर उपस्थित होते. यावेळी किसान महाविद्यालयाकडून उपप्राचार्य डॉ. जी. एच. सोनवणे यांनी रोहित पवार यांचे स्वागत केले तर वसंत सहकारी कारखाना सुरू करणे बाबत निवेदन देण्यात आले.

माजी पालकमंत्री डॉक्टर सतीश पाटील यांचे वसाका सुरू करण्यासाठी आमदार रोहित पवार यांना साकडे आमदार रोहित पवार हे राज्यात अनेक साखर कारखाने उत्कृष्ट चालवत असल्याचे सांगून कासोदा कारखाना सुरू करण्याबाबत त्यांनी आमदार पवार यांच्याकडे मागणी केली. त्यामुळे 5 तालुक्याच्या दुष्काळ दूर होईल असे सांगून उसाची लागवड वाढ होईल. व पुन्हा मतदारसंघातील शेतकरी व कामगारांना गतवैभव प्राप्त होईल यासाठी आमदार पवार यांनी कारखाना सुरु करावा अशी मागणी देखील त्यांनी यावेळी करीत ग्रामदैवत बालाजी महाराजांचे दर्शन घेण्याची विनंती केली.
हेही वाचा: जळगावः नियमित नव्या रुग्णांमुळे कोरोनामुक्तीत अडचण
यावेळी आमदार रोहित पवार म्हणाले की, आपल्या मतदार संघात डॉ. सतीश पाटील यांच्या रूपाने हक्काचा आमदार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करा, वसंत कारखाना बाबत अभ्यास करून निर्णय घेऊ, चोपडा कारखाना (ता.5 नोव्हेंबरला) सुरू होणार आहे वसंत कारखाना बाबत नक्की विचार करू, भाजप हा पक्ष सोशल मीडियाच्या माध्यमातून बारकावे शोधत असतो , इंधन वाढीचा उद्रेक झाला आहे, राज्याचे 35 हजार कोटी केंद्राकडे बाकी असून, आरक्षणाचे अधिकार हे केंद्राकडे असताना केंद्र मात्र दुजभाव करत आहे. इंपिरियल डेटा केंद्रा कडे पडून आहे, केंद्र गुजरातला ठोस निधी देतात मात्र आपल्या राज्याला सावत्र पणाची भूमिका देत आहे , दबावतंत्र वापरून केंद्र देश चालवत आहे ईडी आणि सीबीआयचा वापर करून मुंबई मनपा साठी प्रयत्न सुरू आहे. राज्याने जास्तीत जास्त मदत नागरिकांना देत असल्याचे ते म्हणाले. दरम्यान व शाखा सुरू करण्यासाठी कासोदा येथील कामगार व शेतकरी यांनी आमदार रोहित पवार यांना मागणीचे निवेदन दिले. सूत्रसंचालन व आभार यशवंत पाटील यांनी केले.
Esakal