पुणे : मुंबई-बंगलूरु महामार्गावर नर्हे परिसरात शुक्रवारी रात्री ज्वलनशील पदार्थ (थिनर) घेऊन जाणाऱ्या टँकरने समोरील 15 ते 16 वाहनांना उडविल्याने भीषण अपघात घडला. या अपघातात एकूण 5 जणांचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती पुढे येत आहे. घटनास्थळी पोलिस व अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले असून सिंहगड रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला जात आहे.

बंगलुरुकडून पुण्याकडे थिनर घेऊन जाणारा टँकर उतारावर आल्यानंतर चालकाचे त्यावरील नियंत्रण सुटले. त्याने समोरील येईल त्या वाहनांना उडविण्यास सुरुवात केली. टँकरने सुमारे 15 ते 16 वाहनांना उडवले. तर काही वाहनांना अक्षरशः ओढ़त नेले. या भीषण अपघातात 5 जणाचा मृत्यू झाला असल्याची तसेच 12 ते 13 जण गंभीर जखमी असल्याची प्राथमिक माहिती पुढे येत आहे.

हेही वाचा: Covid19: राज्यात 40 मृत्यू, तर नव्या 1632 रुग्णांची भर

अपघातानंतर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती, त्यामुळे मदतकार्य करणाऱ्यांना अडचण येत होती. दरम्यान पोलिस, अग्निशमन दल दाखल झाल्यानंतर मदतकार्याला वेग आला. थिनरचा टँकर असल्याने जमावाला बाजूला करण्यात आले आहे. तर अग्निशमन दलाच्या जवान नागरिकांच्या मदतीने अडकलेली वाहने बाजूला करत आहेत.

गुरुवारी सायंकाळी याच ठिकाणी झालेल्या अपघातात दोघांना आपला जीव गमवावा लागला होता. त्यानंतर आज पाच जणाना आपला जीव गमवावा लागला आहे.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here