एनसीबीच्या (NCB) अधिकाऱ्यांनी घरी छापा मारल्यानंतर आणि चौकशीसाठी बोलावल्यानंतर अनन्या पांडे चर्चेत आली आहे. NCB कार्यालयातून बाहेर पडतानाची तिची दृश्येही ट्रेंडींगमध्ये आहेत. एनसीबी अधिकाऱ्यांनी तिचा फोन आणि लॅपटॉप जप्त केला आहे.
अनन्याचा सोशल मीडियावर प्रचंड फॅन फॉलोइंग आहे. ती नेहमीच आपल्या कुटुंबासह, शुटिंग आणि तिच्या मित्रांसोबतचे फोटो शेअर करत असते. तिच्या मैत्रिणींबद्दल बोलायचं झालं, तर सुहाना खान (शाहरुख खानची मुलगी) आणि शनाया कपूरसोबत अनेक फोटो तिने शेअर केले आहेत. त्या लहानपणापासून मैत्रिणी आहेत. अनेक वेळी तिने त्यांच्या बालपणीच्या आठवणी शेअर केल्या आहेत. शनाया आणि सुहाना या तिच्या मैत्रिणी नेहमीच तिच्या पाठीशी उभ्या राहिल्या आहेत. “सुहाना, शनाया आणि मी एकत्र वाढलो आहोत आणि एकाच वयाच्या आहोत. म्हणून जेव्हा जेव्हा ट्रोलिंग होते, तेव्हा आम्ही तिघी एकमेकींच्या पाठीशी असतो. वाईट काळात एकमेकांना साथ देतो. मी भाग्यवान आहे, कारण काहीही झाले, तरी त्या नेहमी माझ्यासोबत असतात,” असे तिने म्हटले आहे.

अनन्याने हा फोटो तिच्या सोशल हँडलवर शेअर केला आहे. येथे तिघीही उन्हात पोझ देत आहेत.

अनन्या आणि सुहाना लहानपणापासून चांगल्या मैत्रिणी आहेत आणि अनेकदा त्यांच्या लहानपणीच्या दिवसांचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करतात. सध्या सुहाना खान तिच्या पुढील शिक्षणासाठी परदेशात आहे.

या तिघींना स्वतःला ‘चार्लीज एंजल्स’ म्हणलेले आवडते. अनन्या पांडेने तिच्या इन्स्टाग्रामवर शनाया कपूर आणि सुहाना खानसोबत एक थ्रोबॅक फोटोज् शेअर केले आहे, जेथे त्या आयकॉनिक चार्लीज एंजल्स पोजचे अनुकरण करताना दिसतात.

बॉलिवूड चित्रपटात दिसण्याचे त्यांचे स्वप्न आहे. अनन्याने ‘स्टुडंट ऑफ द इयर 2’ मध्ये पदार्पण केले आहे, सुहाना आणि शनाया यासुद्धा हे स्वप्न साध्य करण्यासाठी सज्ज आहेत.

अनन्या, सुहाना आणि शनाया देखील एकत्र व्हेकेशनसाठी जातात. एकत्र पाण्यात पोहायला जाण्यासाठी त्यांना आवडतं.
Esakal