
गुलमर्ग भागात यंदाच्या मोसमातील पहिली बर्फवृष्टी झाली. यामुळे आता देशभरात हिवाळ्याला सुरुवात झाली आहे. (Photo – ANI)

दक्षिण काश्मीरमध्ये झालेल्या बर्फवृष्टीमुळं फळबागा, उभ्या पिकांचं आणि भात शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. (Photo – ANI)

बडगाम : मेंढपाळ आणि गुराखी मोठ्या प्रमाणावरील बर्फवृष्टीमुळं अडकून पडले होते. (Photo – ANI)

बर्फवृष्टीला सुरुवात झाल्यानं बाहेरुन आलेल्या अनेक पर्यटनस्थळांवर पर्यटकांनी आनंद व्यक्त केला. अनेकांना सेल्फी घेण्याचा मोह आवरला नाही. (Photo – ANI)

बडगाम : अडकलेल्या लोकांची मदत करता जम्मू-काश्मीरचे पोलीस. (Photo – ANI)

जम्मू-काश्मीरमधील रस्ते अशा प्रकारे बर्फमय झाले आहेत. (Photo – ANI)

रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर बर्फाचा थर साचल्यानं अनेक वाहन चालकांचा मोठा खोळंबा झाला. (Photo – ANI)

बडगाम : येथील भटक्या सामाजातील चार कुटुंब बर्फवृष्टीमुळे अडकून पडले होते. (Photo – ANI)

बडगाम : या कुटुंबातील १६ व्यक्तींना जम्मू-काश्मीर पोलिसांनी सुखरुप सुरक्षितस्थळी हलवलं. (Photo – ANI)

राजौरी : येथील मुघल रोडवर मोठ्या प्रमाणावर बर्फवृष्टी झाली. (Photo – ANI)

राजौरी : मुघल रोडवर मोठ्या प्रमाणावर साचलेला बर्फ हटवण्याचे काम सुरु. (Photo – ANI)

राजौरी : या भागात शनिवारी मोठ्या प्रमाणावर बर्फवृष्टी झाली त्यामुळे संपूर्ण परिसर पांढरा शुभ्र दिसत होता. संपूर्ण मुघल रोड यामध्ये हरवून गेला होता. (Photo – ANI)
Esakal