देशात 24 ऑक्टोबरला करवा चौथ (Karwa Chauth 2021) साजर केला जाणार आहे. या दिवशी महिला आपल्या नवऱ्याच्या दिर्घायुष्यासाठी उपवास करतात आणि रात्री चंद्र पाहिल्यावरच उपवास सोडतात. करवाचौथच्या व्रताची सुरूवात सकाळी सकाळी सरगी खाण्यापासून होते. सासुने तयार केलेली सरगी (Sargi)खाल्यानंतर महिलांचे व्रत सुरु होते. सरगीमध्ये जर हेल्दी पदार्थांचा (Healthy food items) समावेश केला तर उपवास करूनही शरीरामध्ये ताकद टिकून राहील. जाणून घेऊन या कोणते पदार्थ तुम्ही सरगीमध्ये (Sargi thali) खाऊ शकता.

नारळ पाणी(CoconutWater) : दिवसाची सुरवात अनश्यापोटी डीटॉक्स वॉटरने करा. नारळ पाणी पिण्यामुळे पचनक्रिया व्यवस्थित राहते पुर्ण दिवस एनर्जी राहते. नारळपाणी सर्वात चांगले डीटॉक्स वॉटर आहे त्यामुळे निर्जल उपावासमध्ये हे तुम्हाला हायड्रेटेड नाही ठेवत तर तुम्हाला इलेक्ट्रोलाईट्स पण संतुलित ठेवते.

भिजवलेले मेवा(Soaked nuts) : दिवसभर शरीरामध्ये एनर्जी राहावी यासाठी भिजवलेला मेवा जसे की 5-6 बादाम, 1-2 अकरोड, 3-6 मनुके. त्याशिवाय तुम्ही भोपळ्याच्या बिया, टरबूजाच्या बिया, जवस, आणि सुर्यफुलाच्या बिया भिजवून खाऊ शकता त्यामध्ये पोषक तत्वांसह भरपूर एनर्जी असते. या मेव्या आणि बिया रात्रभर भिजवून त्यांच्या आवरणामध्ये असलेले एंटी-न्यूट्रिएंट फाइटेट्सच्या पोषक तत्वांना व्यवस्थित शोषून घेतात.

धान्य, भाज्या आणि दही : (Whole grain flours, veggies and curd)-
सरगीमध्ये 7 ते 11 पदार्थ असतात. त्यामध्ये पराठा, चीला, किंवा डोसा सारखे कार्ब असलेले पदार्थ असतात. धान्यापासून बनविलेल्या पीठाचा यामध्ये उपयोग करू शकतो आणि अधित पौष्टिक बनवू शकता. त्यामुळे तुम्ही आपल्या आवडीनुसार कोणत्याही भाजीसोबत खाऊ शकता. आपल्या सरगीमध्ये दही नक्की ठेवा.

पनीर आणि स्टप्ड पोळी ( (Paneer or stuffed roti) – सरगीच्या ताटामध्ये असे पदार्थ असावे ज्यामुळे गॅस किंवा अॅसिडीटीची समस्या नाही होत. तुम्ही स्टफ्ड पोळी दही किंवा भाजीसोबत खाऊ शकता. त्यासाठी तुम्ही घरच्या घरी पनीर बनवून खाऊ शकता. हे प्रोटीनचा खूप चांगला स्त्रोत असून त्यामुळे तुम्हाला दिवसभर भूक लागणार नाही.

फळ (Fruits)-
सरगीमध्ये सर्वात महत्त्वाचे असतात फळ. सरदीमध्ये डाळींब, संतरे किंवा अननस आंबट फळांचा समावेश करा जेणेकरून दिवसभर तहान लागणार नाही कारण या फळांमध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असते. हे फळ डिहायड्रेशन पासून वाचवितात.

रव्याचा शिरा : बाजारात मिळणाऱ्या भरपूस साखर टाकून तयार केलेल पदार्थ खाण्यापेक्षा घरच्या घरी शिरा बनवा. तुम्ही गोड शेवया देखील बनवू शकता.

चहा किंवा कॉफीपासून दूर राहा: सरगीमध्ये चहा किंवा कॉफी पिणे टाळा. त्यामुळे डिहायड्रेशन होऊ शकते. त्याऐवजी तुम्ही एक ग्लास दूध घेऊ शकता किंवा फ्रुट ज्युस देखील घेऊ शकता.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here