मुंबई – आपल्या वेगळ्या भूमिकेसाठी ओळखला जाणारा अभिनेता म्हणून दीपक डोब्रियालचे नाव घेता येईल. तो एक विनोदी अभिनेता आहे. मात्र त्यानं आपण विनोदी भूमिकांमध्ये अडकून पडायचं नाही हे लक्षात ठेवून काही गंभीर भूमिकाही केल्या. आपल्या अभिनयाला थिएटरच्या पार्श्वभूमीची जोड देऊन प्रेक्षकांची पसंती मिळवलेला अभिनेता म्हणून दीपकला ओळखले जाते. त्यानं एका मुलाखतीच्या आधारे काही आठवणींना उजाळा दिला आहे. त्यात आतापर्यतच्या संघर्षगाथेला शब्दबद्ध केले आहे. रोमँटिक कॉमेडी अभिनेता अशा अर्थानं आतापर्यत दीपकला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला आहे.





मी थिएटर करायचं सोडलं याचा मला जराही पश्चाताप नाही. ना त्याची खंत आहे. मात्र आपण ज्या क्षेत्रात सात वर्षे काम केलं ते विसण्यासाठी दोन वर्षे खर्च करावी लागली याची रुखरुख त्याला आहे.

बॉलीवू़डमध्ये दरवर्षी शंभरहून अधिक चित्रपट प्रदर्शित होतात. अशावेळी फार कमी चित्रपट असे असतात की ते प्रेक्षकांना भावतात. आपल्याला अशा चित्रपटांचा भाग व्हायचे आहे असे दीपक सांगतो.
Esakal