बॉलीवूडच्या मागे सध्या एनसीबी हात धूवुन लागली आहे. अशी परिस्थिती आहे. आर्यन प्रकरणानंतर वेगवेगळ्या सेलिब्रेटींना एनसीबीनं चौकशासाठी बोलावलं आहे. दोन दिवसांपूर्वी अभिनेता चंकी पांडे यांची मुलगी अनन्या पांडेच्या घरी एनसीबीनं छापा टाकला होता. त्यामुळे तिला चौकशीसाठीही बोलवण्यात आले होते. त्यानंतर काही सेलिब्रेटी या प्रकरणावर दिलेल्या प्रतिक्रियेमुळे चर्चेत आले. त्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागला. काही अभिनेते असे आहेत की ते त्यांच्या जाहिरातीमुळे नेटकऱ्यांच्या टीकेचा विषय झाले आहेत.




एनसीबीनं अनन्याच्या घरी छापा मारल्यानं बॉलीवूडमधील अनेकांचे धाबे दणाणले आहे. तिची चौकशीही झाली आहे. तिचं आणि आर्यनचं व्हाट्स अॅप चॅट झाले होते. त्यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Esakal