T20 World Cup 2021: टीम इंडियाचा टी२० विश्वचषकातील पहिला सामना पाकिस्तान विरूद्ध आज संध्याकाळी होणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघाने कसून तयारी केली आहे. कर्णधार विराट कोहली, मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि मेंटॉर महेंद्रसिंग धोनी यांच्या मार्गदर्शनाखाली भारताचा संघ दमदार कामगिरी करेल याची साऱ्यांनाच खात्री आहे. याच दरम्यान भारताचा कर्णधार विराट कोहली याने एक फोटो पोस्ट केला. त्या फोटोवरील अभिनेता रणवीर सिंग याची कमेंट चर्चेत होती.

हेही वाचा: IND vs PAK : पाक भारताच्या एक पाऊल पुढे, Playing 11 ची केली घोषणा

विराट कोहलीने भारताच्या नव्या जर्सीमधील एक फोटो पोस्ट केला. त्या फोटोसोबत विराटने काहीही कॅप्शन लिहिले नाही. पण त्याने केवळ १ भारताच्या तिरंग्याचा इमोजी वापरला. या फोटोला मोठ्या प्रमाणावर लाईक्स आणि कमेंट्स मिळाल्या. याच फोटोवर सुप्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंग याने कमेंट केली. “कम ऑन बॉय, यंदाच्या वेळी हा विश्वचषक आपलाच आहे. मस्त खेळा”, अशी कमेंट रणवीर सिंगने केली.

विराट-कोहली-रणवीर-सिंग-कमेंट

विराट-कोहली-रणवीर-सिंग-कमेंट

हेही वाचा: T20 WC: बुमराह, रबाडा नव्हे ‘हा’ गोलंदाज घेईल सर्वाधिक बळी!

दरम्यान, आतापर्यंत भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या टी-२० विश्वचषक सामन्यांमध्ये भारताने पाचही वेळा पाकला पराभूत केलं आहे. सध्यादेखील भारतीय संघ हा कागदावर पाकिस्तानपेक्षा अधिक बलवान आहे. पाकिस्तानने कालच त्यांचा भारताविरूद्धच्या सामन्यासाठीचा संघ जाहीर केला. विराटने आपला संघ जाहीर केला नाही, पण आमचा संघ समतोल असेल, अशी माहिती कॅप्टन कोहलीने दिली.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here