तुर्कीमध्ये काही ना काही वेगळ्या गोष्टी घडत असतात. पुरातत्वशास्त्रज्ञांनी अलीकडेच एक प्राचीन ठिकाण शोधले आहे, जे सुमारे ११ हजार वर्षे जुने आहे. हे एका छोट्या टेकडीच्या तळाशी सापडले आहे. येथे भिंतीवर बनवलेली मानवी आकाराची मूर्ती आणि पेनिसच्या आकाराचे खांब सापडले आहेत. तथापि, त्यावेळी हे बनवण्याचे कारण अद्याप समजलेले नाहीयेय. पण पुरातत्त्वशास्त्रज्ञ अजूनही याबद्दल अभ्यास करत आहेत.
असे मानले जाते की, प्राचीन काळात लोक या ठिकाणी सांस्कृतिक किंवा पारंपारिक गोष्टींचे आयोजन करत होते. मात्र प्रत्यक्षात येथे काय घडले याबद्दल अद्याप काहीही उघडकीस आलेले नाही. हे ठिकाण दक्षिण तुर्कीतील सॅन्लिउर्फा नावाच्या ठिकाणाच्या पूर्वेला आहे. या ठिकाणाचे नाव काराहैटेपे आहे.
इस्तांबुल युनिव्हर्सिटीतील प्रीहिस्टोरिक आर्कियोलॉजिस्ट नेकमी करूल म्हणाले की, माणसाच्या आकाराची मूर्ती आणि पेनिसच्या आकाराचे खांब असलेले हे ठिकाण त्या काळापासूनचे असल्याचे मानले जात आहे. जेव्हा माणसाला लेखणकला अवगत नव्हती. त्यांचा हा शोध अलीकडेच ‘टर्क आर्केओलोजी आणि एटनोग्राफी डर्गिसि ’ (Türk Arkeoloji ve Etnografya Dergisi) मध्ये प्रकाशित झाला आहे. जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या लेखात, नेकमी करुल यांनी हे मानवी आकाराचे आणि पेनिसच्या आकाराचे खांब का बनवले आहेत किंवा त्यांना बनवण्यामागचा हेतू काय आहे, हे स्पष्ट केले नाही . जिथे हे विचित्र प्रकारचे प्राचीन अवशेष सापडले आहेत. पूर्वी तिथे एक इमारत होती, जी तीन स्वतंत्र इमारतींना जोडलेली होती. जे पाहून असे वाटते की, ते एक प्रकारचे कॉम्प्लेक्स होते. नेकमी कारुल यांनी सांगितले की, हे कॉम्प्लेक्स पाहून असे वाटते की, येथे काही प्रकारचे कार्यक्रम होत असतील. कारण ती एक मोठी रचना आहे. ज्यात लोक एकत्र येत असतील. जे या माणसाच्या आकाराच्या मूर्तीभोवती बांधलेल्या पेनिसच्या आकाराच्या खांबांभोवती फिरून काही कार्यक्रम करत असतील. पण कोणत्या प्रकारचे कार्यक्रम झाले असतील, हे अजून माहित नाही. नेकमी करूल म्हणाले की, येथे काय घडत आहे हे शोधण्यासाठी अजून अभ्यास आणि खाणकाम करणे आवश्यक आहे. कारण सहसा कुठल्याही कार्यक्रमात अनेक प्रकारची भांडी, साधने, फर्निचर, दागिने इ.चा उपयोग होतो. यापैकी काही आपल्याला मिळाले, तर पुढे बरेच नवीन गोष्टी समजू शकतील. या ठिकाणी कार्यक्रम झाल्यानंतर या जागेवरील माती भरली जाते. कारण येथे खडकाळ मानवी चेहरा आणि पेनिसच्या आकाराचे खांब आहेत. तसेच, या ठिकाणाबद्दल कोणाला माहिती न मिळाल्यामुळे तेथे कोणतेही नुकसान होण्याची शक्यता कमी होते. काराहैनटेपे हे त्या काळातील प्राचीन ठिकाणं आहे. गोबेक्ली टेपेमध्येही अशाच मोठ्या इमारती, शिल्पे आणि प्राणी यांची मूर्ती दिसली आहेत. हे ठिकाण सन्लिउर्फामध्ये देखील आहे. आता पुरातत्त्वशास्त्रज्ञ या दोन ठिकाणांमधील संबंध शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. काराहैनटेपेचा शोध १९९७ मध्ये लागला. पण तेव्हापासून २०१९ पर्यंत इथे खाणकाम सुरू होऊ शकले नाही. या दरम्यान, तुर्की पुरातत्वशास्त्रज्ञ इतर अनेक प्राचीन ठिकाणांच्या शोधात गुंतले होते. तुर्कीमधून सातत्याने प्राचीन शोध लावले जात आहेत, जे इतिहासाशी संबंधित नवीन खुलासे करत आहेत.