एक महिन्याहून अधिक काळ लोटला तरी स्पेनच्या कॅनरी बेटांवर असलेल्या ‘ला पाल्मा’ ज्वालामुखीचा राग शांत झालेला दिसत नाही. तो सतत लावा आणि राख उधळत आहे. लाव्हाच्या नद्या संपूर्ण बेटातून वाहत जाऊन समुद्रापर्यंत पोहोचल्या आहेत. पृथ्वीच्या गर्भातून बाहेर पडणाऱ्या या लाव्हामुळे संपूर्ण बेट राखेच्या पर्वतांमध्ये बदलले आहे. आता या ज्वालामुखीच्या तोंडातून लाव्हाचे मोठंमोठे गरम वितळलेले पायरोक्लास्टिक दगड बाहेर पडत आहेत. जे लाव्हाच्या नद्यांमधून वाहून उध्वस्त झालेल्या रहिवासी भागात पोहोचत आहेत. हे दृश्य अतिशय भयानक आणि हृदय पिळवटून टाकणारे आहे.

बेटावरील पेट्रोल पंपही लाव्हाच्या नद्यांनी गिळंकृत केल्याची परिस्थिती आहे. पण सुदैवाने लावा येण्यापूर्वीच त्याची टाकी रिकामी झाली. सतत लाव्हाचा उद्रेक आणि राखेचे लोट यांमुळे कोणीही ठार किंवा जखमी झाल्याचे वृत्त नाही. मात्र शहरात विध्वंसशिवाय काहीही दिसत नाही. जे ड्रोनने घेतलेल्या छायाचित्रांमध्ये काही भटके प्राणी काही भागात अडकल्याचं दिसत आहेत. पण त्यांना बाहेर काढणे कठीण होत आहे. मात्र, त्यांना वाचवण्यासाठी एअरलिफ्ट करण्याचा विचार चालू आहे.

तब्बल ५० वर्षांनंतर गेल्या महिन्यात ला पाल्मा ज्वालामुखीचा उद्रेक झाला. लाव्हा हजारो फूट वर फेकला जात आहे. आधी पाच ठिकाणांहून लाव्हारस बाहेर पडत होता, आता मात्र असंख्य ठिकाणांहून बाहेर पडत आहे. पूर्वी लाव्हारसाने शहराला तीन बाजूंनी वेढलं होतं, आता त्याने शहराला चारही बाजूंनी वेढले आहे. आतापर्यंत या लाव्ह्याने १५० हून अधिक घरे जाळली आहेत. रस्त्यांवर लाव्हारसाची भिंत बनली आहे. अगदी जलतरण तलावही वितळले आहेत. ला पाल्मा ज्वालामुखीला ला कुंब्रे व्हिएजा म्हणजे द ओल्ड समिट असेही म्हणतात.

या ज्वालामुखीच्या आसपास असलेल्या निवासी भागातून आतापर्यंत सुमारे ७ हजार लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. स्थानिक ज्वालामुखीशास्त्रज्ञांनी अंदाज वर्तवला होता की, साधारणपणे एक आठवडा लाव्हारस बाहेर पडेल, परंतू आता तो थांबण्याचं नावंच घेत नाहीये. या ज्वालामुखीने इतका लाव्हा फेकला आहे की, तो ज्वालामुखीतून वाहून शहर ओलांडून समुद्रात गेला आहे. लाव्हा २०० मीटर प्रति तास या वेगाने पुढे जात आहे. २१ सप्टेंबर २०२१ पर्यंत, ७०६ दशलक्ष घनफूट किंवा सुमारे २००० दशलक्ष किलोग्रॅम लाव्हा ज्वालामुखीतून बाहेर पडला आणि शहरांमध्ये पसरला. ११ सप्टेंबरच्या सुमारास, स्थानिक प्रशासनाने चेतावणी दिली की, ला पाल्मा ज्वालामुखीचा कधीही उद्रेक होऊ शकतो.

सतर्कतेचा इशारा देण्यापूर्वी, शास्त्रज्ञांनी ला पाल्मा ज्वालामुखीच्या परिसरात ४००० हून अधिक लहान भूकंपांची नोंद केली होती. याला भूकंपाची लाट म्हणतात. जर कुठे सतत भूकंपाची क्रिया होत असेल आणि तेथे जवळ ज्वालामुखी असेल तर त्याचा उद्रेक होण्याची शक्यता वाढते. याचा अर्थ असा की, ज्वालामुखीमधून बाहेर पडण्यासाठी पृथ्वीच्या मध्यभागी असलेला लाव्हा वेगाने वरच्या दिशेने येत आहे.

१६ सप्टेंबर रोजी स्पॅनिश शास्त्रज्ञांच्या लक्षात आले की, भूकंपाचा इशारा दिल्यानंतर ला पाल्मा ज्वालामुखीभोवतीची जमीन फुगण्यास सुरुवात झाली होती. ती सुमारे २.३ इंच वाढली होती. यानंतर, शास्त्रज्ञांनी दुसऱ्या क्रमांकाच्या यलो पातळीचा इशारा जारी केला. कॅनरी आऊलँड इंस्टिट्यूटच्या वॉलकेन मॉनिटरींग डिपार्टमेंटचे प्रमुख लुका डिऑरिया यांनी सांगितले की, जेव्हा आम्ही भूकंपाच्या घटना आणि जमिन फुकल्याची नोंद झाली तेव्हा हा ज्वालामुखी ५० वर्षांनंतर पुन्हा उद्रेक होणार आहे हे निश्चित झाले होतं.

११ सप्टेंबरपासून आतापर्यंत ला पाल्मा ज्वालामुखीच्या आसपास २२ हजारांपेक्षा जास्त भूकंपांची नोंद झाली आहे. १९ सप्टेंबर रोजी लुका डिऑरिया यांनी वर्तवलेली भीती खरी ठरली.

चांगली गोष्ट म्हणजे १६ सप्टेंबरपासून ज्वालामुखीच्या सभोवतालच्या निवासी भागातील लोक सुरक्षित ठिकाणी जाऊ लागले होते. त्यांच्यासोबत पाळीव जनावरे आणि गुरे यांनाही परिसरातून दूर पाठवण्यात आले. लुका डिऑरिया म्हणाले की, पहिल्या दिवशी तो फुटला तोपर्यंत त्याच्या लावाच्या काठाने सुमारे १ किलोमीटर उंची गाठली होती. राख आणि धुराचे ढग सगळीकडे गडद झाले होते. पण ते फारसे समोर आले नाही. या ज्वालामुखीतून अधिक लाव्हा बाहेर पडत आहे. सुरुवातीला असे वाटले होते की, या ज्वालामुखीमुळे एक मोठी त्सुनामी लाट येऊ शकते जी संपूर्ण पूर्व युरोपला व्यापून टाकू शकते, परंतु तसे झाले नाही.

एक प्रचंड त्सुनामी येण्याच्या शक्यतेमागे एक वैज्ञानिक अभ्यास आहे, जो २००१ साली करण्यात आला होता. हा अभ्यास भूभौतिकीय संशोधन पत्रांमध्ये (जियोफिजिकल रिसर्च लेटर) प्रकाशित झाला होता. त्यात असे म्हटले होते की, जर ज्वालामुखीचा पुन्हा उद्रेक झाला तर या पर्वताचा मोठा भाग तुटून अटलांटिक महासागरात पडेल. जे सुमारे १५० ते ५०० घन किलोमीटर क्षेत्र असू शकते. यामुळे अटलांटिक महासागरात सुमारे ८२ फूट उंचीच्या लाटा उसळतील आणि नंतर त्या अमेरिकेच्या किनाऱ्यावर जातील.

ला पाल्मा ज्वालामुखीमुळे आतापर्यंत अर्ध्याहून अधिक शहर जळून खाक झाले आहे. गरम लावा इथे पसरलेला आहे. ज्यातून विषारी धूर निघत आहे. या व्यतिरिक्त, तीन बाजूंनी वाहणाऱ्या लाव्हाच्या प्रवाहामुळे १६६ हून अधिक घरे जमीनदोस्त किंवा खराब झाली आहेत. कॅनरी बेटांवर ८० हजार लोक राहतात, परंतु सर्वात जास्त धोका ज्वालामुखीच्या आसपास राहणाऱ्या ७ हजार लोकांना होता, ज्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here