आजकाल अनेक लोकं सोशल मिडियावर पडीत असतात. वेळ चांगला जावा, लोकांशी संपर्क वाढावा आदी उद्देश त्यात असले तरी तणाव दूर करण्यासाठीही लोक सोशल मीडियाचा आधार घेतात.
आपल्या आजूबाजूला जेव्हा सामाजिक, राजकीय घटना घडतात.तेव्हा त्याचे पहिले चांगले वाईट परिणाम,मते सोशल मिडियावरच व्यक्त केली जातात. काही वेळाने त्या विषयावर गमतीशीर मीम्स चा पाऊस पडतो. त्यामुळे गंभीर विषयाला हास्याची किनार दिल्याने लोकांमध्ये त्या विषयाची अधिक चर्चा होते. असे हे मीम्स खूप उत्साहाने लोकांकडून पाहिले जातात. एका ताज्या अभ्यासानुसार, तणाव दूर करण्यासाठी सोशल मीडियावरील मीम्स एक प्रभावी मार्ग ठरू शकतो, असे म्हटले आहे.

bbm memes
पेन स्टेट युनिव्हर्सिटी ऑफ अमेरिकेने याबाबत अलिकडेच अभ्यास केला. अभ्यासानुसार मीम्स पाहण्यामुळे तुमच्या सकारात्मकतेत वाढ होऊ शकते. तसेच एखाद्या तणावपूर्ण परिस्थितीचा सामना करण्यासही आपण सक्षम होतो. तेथील मानसिक आरोग्याशी संबंधित शास्त्रज्ञांचा विश्वास आहे की, मानसिक आजार असलेल्या तरूण रुग्णांवर मीम्स आणि कार्टूनचा सकारात्मक परिणाम शब्दांपेक्षा अधिक होत आहे.
आत्मविश्वास वाढण्यास मदत- इंटरनेटवरील मीम्स लोकांना त्यांचे प्रश्न सोडवायला मदत करू शकतात का? या संदर्भात सायकोलॉजी ऑफ पॉप्युलर मीडियामध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासामध्ये प्रश्न विचारण्यात आले. डोनाल्ड पी. बेलिसारियो कॉलेजमधील मीडिया स्टडीजच्या प्रोफेसर जेसिका मायरिक म्हणाल्या की, तुम्ही मीम्स पाहिल्यास, मूड सुधारतो, ज्यामुळे तुमची कोरोनासारख्या गंभीर परिस्थितींना तोंड देण्याची क्षमता वाढते. तुमचा आत्मविश्वास वाढतो, असे आम्हाला अभ्यासात आढळून आले.
असा केला अभ्यास – 748 लोकांना या अभ्यासात सहभागी करून घेतले होते. त्यांना 3 फोटोंचा सेट दाखविण्यात आला. त्यानुसार त्यांच्या प्रतिक्रियांचा अभ्यास करण्यात आला. अर्ध्या लोकांना मीम्स दाखविण्यात आले. तर इतरांना फक्त चित्रे दाखविण्यात आली. ज्यांनी मीम्स पाहिले त्यांच्या सकारात्मकतेत इतरांच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाल्याचे अभ्यासाच्या निकालांवरून स्पष्ट झाले.
Esakal