चांदवड (जि. नाशिक) : मुंबई- आग्रा महामार्गावर राहुड घाटात एकाच वेळी चार वाहनांचा विचित्र आणि भीषण अपघात झाला. गॅस टँकर, बायो डिझेल टँकर, खजूराने भरलेला ट्रक व I20 कार या चार वाहनांचा भीषण अपघात झाला. यामध्ये एक ठार तर दोन जण जखमी झाले.
देवळा व चांदवड तालुक्यादरम्यान असणाऱ्या झालेल्या या अपघातामुळे नाशिककडे जाणारी वाहतूक देवळा मार्गे वळवण्यात आल्याने देवळा-सोग्रस मार्गावरील ट्रॅफिक वाढली. वाहनांच्या दिड ते दोन किलोमीटर पर्यंत रांगा लागल्या. मुंबई-आग्रा महामार्गावर वाहतूक ठप्प झाल्याने महामार्ग काही वेळासाठी बंद होता.
हेही वाचा: नाशिक : घरच्या घरीच उपचारामुळे लेकीचा मृत्यु, वडिलांविरोधात गुन्हा

मुंबई-आग्रा महामार्गावर राहुड घाटात अपघात

मुंबई-आग्रा महामार्गावर राहुड घाटात अपघात
Esakal