कॅन्टोन्मेंट- रिक्षा सेवा देताना गणवेश महत्वाचा असून तो परिधान करणे गरजेचे आहे. त्यामुळे आपली ओळख दिसून येते. रिक्षाचालकांनी नियमांचे पालन करून सेवा दिल्यास त्यांचे कौतूकच होईल, अशा शब्दात पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी रिक्षाचालकांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.

रेल्वे स्टेशन परिसरात अल्पवयीन मुलीवर बलात्काराच्या घटनेत रिक्षाचालकांचा सहभाग आढळल्यानंतर त्यांच्यावर टिकेची झोड उठली होती. मात्र, सगळेच चालक तसे नाहीत. नियम पाळून चांगली सेवा देणा चालकांसाठी लष्कर पोलिसांनी ‘माझी रिक्षा – सुरक्षित रिक्षा’ ही योजना राबविली. यामध्ये सर्वोत्तम सेवा देणाऱ्या चालकांना रोख रक्कम, पुष्पगुच्छ देऊन आयुक्त गुप्ता यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी आझम कॅम्पस असेंब्ली हॉल येथे कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी ज्येष्ठ साहित्यीक श्रीपाल सबनीस, पोलीस उपायुक्त सागर पाटील, सहायक पोलीस आयुक्त चंद्रकांत सांगळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम आदी उपस्थित होते. यावेळी ‘माझी रिक्षा – सुरक्षित रिक्षा’ योजनेत सहभाग घेणाऱ्या चालकांना सन्मानित करण्यात आले.

गुप्ता म्हणाले, रिक्षाचालकांसाठी लष्कर पोलीस ठाण्याने चांगला उपक्रम हाती घेतला आहे. योजनेत सहभागी झालेल्या रिक्षाचालकांबाबत नागरिकांचे अभिप्राय येत असून चांगली सेवा देणाऱ्यांचे कौतूक होते. हा उपक्रम शहर पातळीवर देखील राबविला जाईल. चालकांनी नियमांचे पालन करण्याची गरज असून नियम न पाळण्याऱ्यांवर कारवाई करण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

अशोक कदम म्हणाले, चांगली सेवा देणाऱ्या चालकांचा गौरव व्हावा, या उद्देशातून ही योजना राबविण्यात आली.स्थानिक लोकांच्या सहकार्यातून योजना चांगला प्रतिसाद मिळाला.

स्पर्धेत १६ रिक्षा चालक यांनी सहभाग घेण्यासाठी फॉर्म भरला होता.त्यापैकी १०६ स्पर्धक सहभागी झाले होते सुमारे १२ दिवस स्पर्धा चालु असताना नागरीकांनी दिलेल्या अभिप्रायावरुन व रिक्षा चालक यांच्या वर्तणुक वाहतुक नियमांचे पालन यावरुन विजयी स्पर्धकांची निवड करण्यात आली.

हेही वाचा: दिवाळीसाठी बाजारपेठ सज्ज लॉकडाऊन मधील नुकसान भरून काढण्याचा व्यापाऱ्यांचा निर्धार

प्रथम बक्षिस रोख (१) ११०००/-रुपये, सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र (२) द्वितीय बक्षिस रोख ५०००/- रु सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र (३) तृतिय बक्षिस रोख ३०००/- रु सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र (४) उत्तेजनार्थ ०५ बक्षिसे प्रत्येकी रोख १०००/- रू व प्रमाणपत्र (५) उत्तेजनार्थ १० बक्षिसे प्रत्येकी रोख ५००/- रु व प्रमाणपत्र अशी बक्षिसे पोलीस आयुक्त गुप्ता यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. तसेच सदर स्पर्धेत सहभागी स्पर्धकांना सहभाग झाल्याचे प्रमाणपत्र व त्यांचा लष्कर पोलीस स्टेशन यांच्या वतीने एक लाख रुपयांचा विमा काढल्याचे सर्टीफीकेट देण्यात आले.

…लष्कर पोलिसांचे सायकल पेट्रोलिंग

लष्कर पोलीस ठाण्यातील कर्मचारी आता हद्दीमध्ये सायकलवरून गस्त घालणार आहेत. शहर पोलीस दलातील समर्थ पोलिसांनतर आता लष्कर पोलिसांच्या ताफ्यात १२ सायकली दाखल झाल्या आहेत. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या उपस्थितील शनिवारपासून (दि. २३) ही योजना सुरू करण्यात आली. यावेळी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here