मुंबई : भीमराज की बेटी मै तो जयभीम वाली ह आपल्या खणखणीत आवाजात कव्वाली,भिमगिते गावून लाखो आंबेडकरी अनुयायामध्ये उर्जा भरणाऱ्या गायिका वैशाली शिंदे यांच्या नशीबात अधारातील जीणं आल आहे. कोरोना संकटाने वैशाली शिंदे यांच्यासारख्या हजारो कलावंताची रोजीरोटी हिसकावली आहे. घाटकोपर भागातील झोपडीवजा घरात राहणाऱ्या शिंदे पहिलं बिल कसबसं भरल, मात्र दुसरं विजबील भरायला पैसै नव्हते. त्यामुळे महावितरणने मीटर कापले. त्यामुळे नव्वदीच्या दशकात कव्वालीचा फड गाजवणारी ही गायिका आता अंधारात दिवस ढकलत आहे.
घाटकोपरच्या एका झोपडपडीत वैशाली शिंदे राहतात. शिंदे यांनी वयाच्या 17 व्या वर्षापासून आंबेडकरी गीते, कव्वालीचे कार्यक्रम करत आंबेडकरी अनुयायामध्ये नावलौकिक मिळवला. कव्वाली, संगीताच्या कार्यक्रमानिमीत्त वैशाली शिंदे यांनी संपुर्ण महाराष्ट्रासह देश पालथी घातला आहे.मात्र कोरोनामुळे हातची बचत संपली, त्यामुळे जगण्यासाठी त्यांना अनेकांकडे हात पसरण्याची वेळ आली. या काळात घर चालवण्यासाठी स्वतःची ओळख लपवून रस्ते, डांबरीकरणाचे कामही त्यांना करायला लागलं.
हेही वाचा: ‘नाबार्ड’ने पतसंस्थांनाही वित्तपुरवठा करायला हवा; सुरेश पाटील
वैशाली शिंदे यांनी तब्बल 42 वर्षे भिमगीतासह, उर्दू, आग्रीकोळी गितासोबत कव्वालीचे फड रंगवले आहेत. आघाडीचे गायक विठ्ठल उमप, प्रल्हाद शिंदे, गोविंदराव म्हशीलकर, नवनीत खरे, आनंद शिंदे, मिलिंद शिंदे यांच्यासह संदिप शिंदे, मनोजराजा गोसावी, राहुल शिंदे यांच्या सोबत गायन केलंय. तर प्रकाशनाथ पाटणकर, छोटे मज्जीद शोला, हमीद मनचला यांच्या सारख्या मोठ्या कव्वालासोबत कव्वालीचे फड वैशाली शिंदे यांनी गाजवलेत. टी सिरीज, व्हीनस, टिप्स, युनिव्हर्सल अशा सर्वच नामांकित म्युझिक कंपन्यांसोबत त्यांनी 250 हून अधिक कॅसेट काढल्यात.
पतीसोबत 26 वर्षापासून विभक्त झालेल्या वैशाली शिंदे आपल्या मुलाला सांभाळत असताना, तब्येतीने धोका दिला 2016 त्यानी बायपास झाली. मात्र त्यानंतरही त्या स्वस्थ बसल्या नाही. “भीमराज की बेटी मै तो जयभीम वाली हु” या गाण्याने दमदार पुर्नआगमन केल्यानंतर गमावलेला आत्मविश्वास परत मिळाला, मात्र आता कार्यक्रम मिळत नाही. 90 च्या दशकात नाव, पैसै असताना वैशाली शिंदे यांनी अनेक नवोदीत गायकाना मदत केली, मात्र आज साधी तब्बेत विचारण्यासाठीही कुणी फोन करत नसल्याची खंत त्या व्यक्त करतात. उर्जामंत्री नितीन राऊत यांनी आर्थिक मदत केल्याचं त्यांनी आवर्जुन सांगीतलं.

मुंबई
जव्हार,मोखाड्यात 1986 कव्वालीचा सामना रंगला होता. आनंद शिंदे यांनी नवीन पोपट लागला मिठू मिठू बोलायला हे गाण म्हटलं होत. त्याला वैशाली शिंदे यांनी आवड याची याला, आवडली कशी, चावक्या या पोपटाला पडलाय फशी, चावणाऱ्या पोपटाला मी स्वर्गाला धाडीते, या शब्दात प्रत्युत्तर दिलं होतं, त्यावेळी ते खूप गाजंल होत.
अंधारात राहण्याचा खूप त्रास होतो मात्र काय करणार, मेणबत्तीच्या प्कारशात कशीबशी रात्र काढल्यानंतर सकाळी सकाळी त्या आणि त्यांचा मुलगा काम शोधायला बाहेर पडतात. सध्या दोन वेळच्या अन्नाचा प्रश्न महत्वाचा आहे. विज बील भरायला पैशैच नाही, त्यामुळे विज केव्हा येईल माहिती नाही. असही वैशाली शिंदे सांगतात.
हेही वाचा: डेंगी, चिकूनगुनिया रुग्णांनी काय खावे? आहारतज्ञ सांगतात की..
नोटबंदीपासीन ते कोरोना संकटामुळे गेल्या चार वर्षांपासून कलाकारांना अनंत आर्थिक अडचणी आल्यात. त्यामुळे उंच शिखरावरून मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडलं गेल्यासारखं वाटतंय, मात्र डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा वसा माझ्या सोबत असल्याने मरेपर्यंत मी माझी गायकी सोडणार नाही.
Esakal