नागपूर : तुकडोजी महाराज यांना राष्ट्रसंत म्हणून ओळखले जाते. अंधश्रद्धा निर्मूलन व जातिभेदाच्या निर्मूलनासाठी त्यांनी भजनांचा आणि कीर्तनाचा प्रभावीपणे वापर केला. आत्मसंयमाचे विचार त्यांनी ग्रामगीता या काव्यातून मांडले. त्यांनी मराठी व हिंदी भाषांमध्ये काव्यरचना केली आहे. तुकडोजी महाराजांनी इ.स. १९३५ मध्ये मोझरी येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली. खंजिरी भजन हा प्रकार त्यांच्या प्रबोधनाचे वैशिष्ट्य होते. तुकडोजी महाराज हे आधुनिक काळातील महान संत होते. (सर्व छायाचित्रे – संदीप राऊत)

१९९५‌ साली श्री क्षेत्र वरखेड येथे सदगुरू आडकोजी महाराज पुण्यतिथी महोत्सवात प्रबोधन करताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
मुंबई येथे जनजागृती करताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
ग्रामगीतेचे लेखन करताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज (१९५५)
ब्रम्हपुरी येथील श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या चातुर्मास्य वर्गास बौद्धिक देताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज (१९६७)
तृतीय गांधी स्मृतिदिनानिमित्त आमगाव आदर्श जि. भंडारा येथे लालबहादूर शास्त्री यांच्या समवेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज (१९५३)
महालक्ष्मी मंदिरमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांसोबत गोळवेलकर गुरुजी, मसूराश्रमचे स्वामी ब्रम्हचारीजी (मुंबई) व अन्य मान्यवर
तुकाराम बीजनिमित्त भजनाचा कार्यक्रम करताना राष्‍ट्रसंत तुकडोजी महाराज व अन्य
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समवेत राष्ट्रसंतांचे खंजेरी भजन (डावीकडून) सर्वश्री शेषराव आमले, दिगांबरबुवा हिरपूरकर, जनार्दन बोथे, भगवान दशमुखे व मच्छींद्रनाथ चव्हाण

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here