लग्न झाल्यावर सुरवातीचे दिवस मोरपंखी असतात. सतत एकमेकांबरोबर राहायला हवं असते. पण काही काळांनी काहीतरी खटकायला लागतं. पूर्वी जो स्वत साठी वेळ मिळत होता, तो मिळेनासं झाल्याचं लक्षात यायला लागतं. आणि मग तु मला स्पेसच देत नाहीस… यावरून वाद सुरू होतात. नवरा बायकोच्या नात्यात दोघांनी एकमेकांना स्पेस दिली नाही तर नात्यात कडवटपणा येतो असं म्हणतात. म्हणूनच स्पेस दिली जाणं गरजेचं आहे.
स्पेस कशी जपता येईल- प्रत्येकाला स्वतःच्या आवडी निवडी जपण्यासाठी वेळ हवा असतो. त्यासाठी विशिष्ट वेळ काढला जातो. ती वेळ स्वतःचा आनंद मिळवत घालवण्यात अनेकांना आवडतं. यावेळी इतर कोणाचाही डिस्टर्बन्स त्यांना नको असतो. यासाठी जर पार्टनरने ही बाब समजून घेतली त्याला-तिला स्पेस जपण्यासाठी मदत केली तर त्या व्यक्तीला तिचा असा स्पेशल वेळ मिळु शकतो. अर्थात स्पेस म्हणजे जोडीदाराच्या गरजा दुर्लक्ष करणे असा अर्थ होत नाही. त्यामुळे घराच्या, जोडीदाराच्या गरजांना प्राधान्य देत स्वतासाठीही काही काळ राखून ठेवणे म्हणजे स्पेस जपणे असे म्हणता येईल.
हेही वाचा: …शेवटी ‘ती’ आईचं! हा व्हिडीओ नक्की पाहा

दोन जागा
असा काढा मार्ग-
नवरा बरेचदा घराबाहेर असल्यामुळे तो स्वतछला पाहिजे तेवढा वेळ देऊ शकतो. किंवा तसा प्रयत्न आयत्यावेळी केल्यास ते त्याला जमू शकते. पण बायकोला असा वेळ देता येत नाही. तिला घरातल्या जबाबदाऱ्या अधिक असतात. त्यामुळे तिची अडचण जर नवऱ्याने समजून घेत तिला मदत केली तर त्यांच्यातले नाते अधिक बहारायला मदत होईल.
या स्पेसचा उपयोग स्वतकडे डोळसपणे बघण्यासाठी करता येऊ शकतो. आपल्या कमतरतेवर डोळसपणे विचार करून नवे नाते खुलवण्यासाठी उपयोग करता येईल.
नव्या गोष्टी शिकता येऊन स्वतला अपडेट ठेवता येईल. ग्रुमिंग करण्यावरही भर दिलात तर अधिक फायदा होईल.
लग्न झाल्यानंतर एकमेकांच्या मित्र-मैत्रिणींना, नातेवाईकांना वेळ देता येत नाही. या स्पेस चा उपयोग मित्र-मैत्रिणींना भेटून आनंदात घालवता येईल.
एकमेकांना पुरेसा अवकाश दिल्यास दोघांचे नाते अधिक घट्ट होण्यास मदत येईल.
Esakal