Friends ‘फ्रेंड्स’ या लोकप्रिय टीव्ही शोमध्ये ‘गंथर’ची Gunther भूमिका साकारणारा अभिनेता जेम्स मायकल टेलर James Michael Tyler याचे रविवारी निधन झाले. तो ५९ वर्षांचा होता. २०१८ मध्ये जेम्सला कर्करोग झाल्याचं निदान झालं होतं. जून २०१९ मध्ये त्याने स्टेज ४ चा कर्करोग झाल्याची माहिती चाहत्यांना दिली होती. ‘जगभरातील चाहते त्याला गंथर म्हणून ओळखतात. पण माकलचे जवळचे व्यक्ती त्याला अभिनेता, संगीतकार, कर्करोगाविषयी जनजागृती करणारा सजग नागरिक आणि प्रेमळ पती म्हणून ओळखतात’, असं विधान जेम्सच्या मित्राने केलं.
मे महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या ‘फ्रेंड्स: द रियुनियन’ या भागातून जेम्स प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. मात्र आरोग्याच्या समस्यांमुळे तो प्रीमिअरच्या दिवशी इतर कलाकारांसोबत उपस्थित राहू शकला नव्हता. व्हिडीओ कॉलिंगद्वारे त्याने त्याच्या भावना व्यक्त केल्या होत्या. ‘माझ्या आयुष्यातील ती विस्मरणीय १० वर्षे होती. तो संपूर्ण अनुभव माझ्यासाठी खास होता’, असं तो म्हणाला होता.

हेही वाचा: ‘फ्रेंड्स रियुनियन’नंतर ‘चँडलर’चं ब्रेकअप; २२ वर्षांनी लहान गर्लफ्रेंडशी तुटलं नातं
जेम्सने ‘फ्रेंड्स’ या अमेरिकन सिटकॉममध्ये सेंट्रल पर्क कॉफी शॉपच्या मॅनेजरची भूमिका साकारली होती. याशिवाय त्याने ‘स्क्रब्स’, ‘मॉडर्न म्युझिक’ आणि ‘सब्रिना : द टिनेज विच’ यांमध्येही काम केलं आहे. जेम्सच्या निधनावर अनेक कलाकारांनी शोक व्यक्त केला आहे.
Esakal