करवा चौथ हा सण देशभरात साजरा करण्यात आला. सगळीकडेच काल करवाचौथ थाटामाटात साजरा झाला. सेलिब्रेटीही यात कमी नाही पडले. बॉलिवुडमधील काही जोडप्यांची ही पहिली करवाचौथ होती, तर काहीजणी दरवर्षी आपली करवाचौथ त्याच उत्साहाने साजरी करतात. बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये दरवर्षी करवा चौथ हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. अभिनेत्री तिच्या पतीसाठी करवा चौथ व्रत करतात. या दिवशी मस्तपैंकी सजतात. 2021 च्या करवा चौथमध्येही हेच दिसून येत आहे. बॉलिवूड अभिनेत्री विविध एथनिक आउटफिटमध्ये दिसत असून त्यांचे करवाचौथचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.









Esakal