कापूस या वनस्पतीपासून मोठ्याप्रमाणात धागा तयार केला जातो. कापूस हे एक नगदी पीक आहे. कापसाला पाण्याचे आकर्षण आहे. सुती कपडे घातल्यास हाच गुणधर्म घाम टिपून घ्यायला मदत करतो. म्हणूनच उष्ण कटिबंधातील देशात सुती कपडे प्राधान्याने वापरतात. कापूस खूप मऊ असतो. कापसाच्या बियांना सरकी म्हणतात. सरकी हे गुरांचे खाद्य आहे, तर सरकीचे तेल स्वयंपाकासाठी वापरायचे एक स्वस्त तेल आहे. या तेलाचा साबणाच्या आणि अन्य व्यवसायांत वापर होतो.

साधारणत: इसवी सन पूर्व 7000 वर्षांपूर्वीपासून भारतीय उपखंडात कापसाची शेती केली जाते. याचा पुरावा पाकिस्तानातील मेहरगढ या ठिकाणी झालेल्या उत्खननातून मिळाला. हजारो वर्षांपूर्वी प्राचीन भारत, चीन आणि इजिप्तमध्ये कापसाच्या धाग्यांपासून कपडे तयार केले जात आहे. विदर्भातलं पांढर सोनं म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या कापूस वेचणीच्या वेळेस शेतकरी माय बाप कशी पुजा करतात हे पाहूया.

विदर्भातल्या कापूस वेचणीची पूजा

विदर्भातल्या कापूस वेचणीची पूजा

विदर्भातील परंपरा : कापूस पुजन…

कापूस वेचणीला सुरवात करण्यापूर्वी शेतकरी धरती मातेची मनोभावे पूजा करतात. कापूस वेचणीला आला की ग्रामीण भागात पहिला वेचा करण्यापूर्वी दूध उतु घालणे ही शेतकऱ्यांची पूर्वापार चालत आलेली परंपरा आहे.

विदर्भातल्या कापूस वेचणीची पूजा

विदर्भातल्या कापूस वेचणीची पूजा

शेतकरी मोठ्या कष्टाने, घाम गाळून पिकवलेला कापसाचा पहिला वेचा वेचायच्या वेळेस कशी पूजा करतात ते पाहुया…

शेतात जातांना आई हळद, कुंकू, दूध, साखर, नारळ, दुध, मातीचं बोळकू हे साहित्य सोबत घेऊन जाते. मग फुटलेल्या कापसाची बोंड तोडून त्यांची माळ करून ती कापसाच्या झाडाला अडकवते. मग हळद-कुंकू वाहून मनोभावे त्याची पुजा करते. नंतर एका लहान बोळक्यात दूध घालायचे. 3 मातीच्या ढेकळांवर मग ते बोळकू ठेवून त्याखाली आग लावते.

विदर्भातल्या कापूस वेचणीची पूजा

विदर्भातल्या कापूस वेचणीची पूजा

पुढे दुध ज्या भागाकडे उतू जाईल त्या भागाकडून कापूस वेचणीला सुरुवात करते. नंतर नारळ फोडून त्याचा प्रसाद मजुरांमध्ये वाटून दिला जातो. आई भोळा भाव ठेवून पुजा करते. तिचा हेतू एकच असतो, तिनं अन बापानं प्रचंड कष्ट घेऊन ते पिक पिकवलेलं असतं त्याला चांगला भाव मिळावा. अन् कष्टाचं चीज व्हावं हेच तिचं निसर्गाकडे मागणं असतं.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here