
चेहऱ्यावर असणारं स्मितहास्य आणि दिलखेचक आवाजाच्या बळावर प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणाऱ्या नेहा कक्कर हिच्या लोकप्रियतेविषयी वेगळं सांगण्याची काहीच गरज नाही.

बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर सोशल मीडियावर खूपच सक्रिय असते. ती दररोज तिच्या चाहत्यांसोबत मनोरंजक पोस्ट शेअर करताना दिसतेय.

अलीकडेच ती पती रोहनप्रीत सिंहसोबतचे रोमँटिक फोटो शेअर केल्यामुळे चर्चेत आलीय.

नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंग यांच्या लग्नाला 24 ऑक्टोबरला एक वर्ष पूर्ण झालेय आणि या लग्नाचा पहिला वाढदिवस दोघांनीही खास पद्धतीनं साजरा केलाय.

नेहा आणि रोहनप्रीत दोघांनी त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस एका सुंदर ठिकाणी बोटीवर बसून साजरा केला.
Esakal