सध्या बिग बॉस मराठीचा तिसरा सीझन चांगलाच रंगला आहे. सोशल मीडियावर शो आणि त्यातील स्पर्धक नेहमीच चर्चेत असतात.तसेच स्पर्धकांच्या घरातील वावरामुळे ते सतत ट्रोल देखील होत असतात. तर सध्या बिग बॉसच्या घरातील स्पर्धक स्नेहा वाघ चांगलीच ट्रोल होत आहे. बिग बॉसच्या घरात आल्यापासूनच स्नेहा नेटेकऱ्यांच्या रडारवर आहे. पहिले तिचे अयशस्वी ठरलेले दोन लग्न , नंतर तिची आणि जय दुधाणेची वाढलेली मैत्री यांमुळे ती नेहमीच चर्चेचा भाग ठरली आहे. पण आता नेटेकरी स्नेहाची वेगळ्याच कारणांवरुन मजा घेत आहे.
स्नेहा रोज सकाळी उठल्यावर बिग बॉसच्या घरातील कॅमेरात बघुन ‘सरांगे बिग बॉस…सरांगे’ असं म्हणते. यावरूनच नेटेकऱी भन्नाट मीम्सचा वर्षाव करत आहेत आणि आता हे मीम्स प्रचंड वायरल देखील होत आहे. ‘सरांगे’ (saranghae) हा शब्द कोरिअन असून या शब्दाचा अर्थ ‘आय लव्ह यू’ असा आहे. पण याआधी या शब्दाचा अर्थ लोकांना माहिती नव्हता. त्यामुळे ही काय बोलतेय हे लोकांच्या लक्षात येत नव्हते. नंतर प्रेक्षकांना या शब्दाचा अर्थ समजला पण तोपर्यंत नेटकऱ्यांनी तिच्यावर मीम्स तयार करायला सुरुवात केली. तर काहींनी ‘बिग बॉसचा, मराठी पर्व चालवत आहात की कोरियन पर्व?? मराठी भाषेचा मान हा ठेवला पाहिजे हे आपण कृपया स्नेहा वाघला सांगावे,कारण लोक आता सरांगे ऐकून कंटाळले आहेत.’असं एकाने व्टिट केलं आहे.
हेही वाचा: भारत-पाक सामन्यानंतर ‘पनौती’ म्हणत अक्षय कुमारला केलं ट्रोल

मनोरंजन
स्नेहाने वयाच्या १९ व्या वर्षी अविष्कार दार्वेकसोबत लग्न केलं होत. पण अगदी कमी कालावधीतच त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर २०१५ मध्ये स्नेहाने अनुराग सोलंकीशी लग्न केलं, पण लग्नाच्या आठ महिन्यानंतरच त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. आता बिग बॉसच्या घरात स्नेहाची जयसोबतच्या वाढलेल्या बॉडिंगवर काही प्रेक्षकांनी नापसंती दर्शविली आहे.
Esakal