वजन कमी करण्यासाठी योग्य आहारासोबतच, तो आहार आपण कोणत्या वेळी घेत आहोत, हेही महत्त्वाचं आहे. अशा काही गोष्टी आहेत ज्या अत्यंत पौष्टिक आहेत, परंतु त्या कोणत्याही वेळी खाणे फायदेशीर ठरत नाही. त्या सकाळी किंवा रात्री खाण्यास मनाई आहे. आयुर्वेदात खाण्यापिण्याच्या नियमांचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यानुसार काही पदार्थ दिवसा खाऊ नयेत तर काही पदार्थ रात्री झोपण्यापूर्वीही खाऊ नयेत; कारण त्यामुळे वजन वाढू शकते. चला, जाणून घ्या त्या पदार्थांबद्दल-

मैदा पचायलाही खूप वेळ लागतो, त्यामुळे मैद्यापासून बनवलेल्या गोष्टी रात्री खाऊ नयेत. भटुरे, समोसे किंवा मैद्यापासून बनवलेल्या इतर वस्तू खाल्ल्यावर झोपू नये. त्यामुळे पोटाची चरबी झपाट्याने वाढते.

जर तुम्हाला ब्रेड खाण्याची सवय असेल तर तुम्ही व्हाईट ब्रेडच्या जागी ब्राऊन ब्रेड घेऊ शकता. रात्री व्हाईट ब्रेड कधीही खाऊ नका. कारण व्हाईट ब्रेड खाल्ल्यानंतर खूप तहान लागते, ज्यामुळे व्हाईट ब्रेड पोटात फुगतो आणि आतड्यांना नुकसान होते.

रात्रीच्या वेळी दूध-केळ्याचे सेवन केल्याने चांगली आणि लवकर झोप येते, असा अनेकांचा समज आहे, मात्र तसे नाही. रात्री दूध-केळी खाल्ल्याने अॅसिडिटीचा त्रास होऊ शकतो. नाश्त्यात दूध-केळी खाणे उत्तम.
Esakal