आजच्या धकाधकीच्या जीवनातील तणावामुळे लोकांमध्ये व्यसन करण्याचे प्रमाण वाढत आहे. धूम्रपानामुळे होणाऱ्या नुकसानाची चांगली माहिती असूनही, संबंधित प्रोडक्टसचा वापर वाढला आहे. बऱ्याच लोकांना धूम्रपानापासून सुटका हवी असते पण अनेकदा त्यांचा संकल्प तुटतो. स्मोकिंग कमी करण्यासाठी, लोक च्युइंगम सारख्या निकोटिक्सचा वापर करतात, परंतु बऱ्याचदा ते त्याचा उपयोग होत नाही. सवय सुटली नाही तर वेगळा खर्च वाढतो. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला देखील तुमच्या कुटुंब, मित्रांना किंवा स्वतःला या वाईट सवयीपासून दूर व्हायचे असेल तर तुम्ही असे घरगुती उपाय करून पाहू शकता ज्यांचे दुष्परिणाम होत नाहीत.
सिगारेट सोडण्याच्या टिप्स…
धूम्रपानामुळे जगात दरवर्षी लाखो लोकांचा मृत्यू होतो. भारतातही धूम्रपानाच्या दुष्परिणामांशी संबंधित चिंताजनक बातम्या अनेकदा समोर येतात. अशा परिस्थितीत, जर तुम्हालाही हे व्यसन सोडायचे असेल किंवा कमी करायचे असेल तर पहिल्यांदा तुमची इच्छाशक्ती (व्हिलपॉवर) मजबूत करा आणि हे घरगुती उपाय करा. त्यांचा कोणताही दुष्परिणाम होत नाही, तर या गोष्टींचे नियमित सेवन केल्याने तुम्हाला मोठ्या प्रमाणात फायदा होईल.
(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी ‘सकाळ ऑनलाइन’चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

तज्ञांच्या मते, जर तुम्हाला धूम्रपान करण्याची इच्छा होत असेल तर तुम्ही थोड्या-थोड्या वेळाने एक चमचा किसलेले मुळा चघळू शकता. जर ते खूप कडू असेल तर ते मधासोबत देखील सेवन केले जाऊ शकते.

ओट्स तणाव कमी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यात असलेले फायबर आणि मॅग्नेशियम मेंदूत सेरोटोनिनचे प्रमाण वाढवतात. ओट्स खाण्याने मन शांत राहते. जे ओट्स खातात त्यांनाही चांगली झोप लागते. तुम्ही ओट्समध्ये ब्लुबेरी देखील खाऊ शकता, ज्यांचे अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी तणावाशी लढण्यास मदत करतात. तज्ञांच्या मते, ओट्स शरीरातून विष बाहेर काढून धूम्रपानाची इच्छा कमी करण्यास मदत करतात.

धूम्रपान हळूहळू सोडण्याचा एक मार्ग म्हणजे जेव्हाही तुम्हाला धूम्रपान करावेसे वाटेल तेव्हा लगेच 1 ग्लास पाण्यात चिमूटभर लाल तिखट मिसळून प्या. असे केल्याने तुम्हाला काही काळ व्यसनापासून तात्काळ आराम मिळेल.

जर तुम्हाला धूम्रपान करण्याची इच्छा वाटत असेल तर तुम्ही ज्येष्ठ मधाच्या काड्या चावू शकता. असे केल्याने धूम्रपान करण्याची इच्छा कमी होईल. धूम्रपानाव्यतिरिक्त, ते चघळल्याने, इतर तंबाखूजन्य पदार्थांचे व्यसन देखील हळूहळू कमी केले जाऊ शकते.

सिगारेटपासून सुटका मिळवायची असेल तर मोसंबीचा रस किंवा रसाळ फळांचे सेवन करा.

धूम्रपान सोडण्याच्या पहिल्या आणि मुख्य उपायाबद्दल बोलायचे तर, ते गरम पाण्याचे सेवन करणे हा आहे. एक ग्लास कोमट पाण्यात एक चमचा मध प्यायल्याने सिगारेट पिण्याची सवय सोडण्यास मदत होते. हे काही रामबाण औषधापेक्षा कमी नाहीयेय.

काकडी, गाजर, दोडका, वांगी खाल्ल्यानंतर सिगारेट पिण्याची इच्छा होत नाहीयेय. तज्ञांच्या मते, भाज्यांची जास्त मात्रा निकोटीनवर प्रभाव टाकते.

स्मोकिंग कमी करण्यासाठी, लोक च्युइंगम सारख्या निकोटिक्सचा वापर करतात, ज्यामुळे सिगारेटचे व्यसन कमी होते.
Esakal