दिवाळी अवघ्या काही दिवसांवर आलीय. या काळात परंपरा जपण्याकडे अनेकांचा कल असतो. महिलांच्या ठेवणीतल्या साड्या जरा बाहेर काढल्या जातात. त्यांना उन दाखवलं जातं. पण, सणासुदीच्या काळात नवी साडी, ड्रेस घेतलाच जातो. यात पारंपारिक कपड्यांना जास्त मागणी असते. साड्या ड्रेसमध्ये सध्या सगळ्यात फेमस आहे ते पैठणीचे, खणाचे ड्रेस, तर खण आणि इरकल साड्या घेण्याकडे सध्या अनेकींचा कल आहे. खण, इरकल आवडतं कारण त्यानं मिळणारा ट्रेडिशनल लूक. रंगाचं वैविध्य बघायला मिळतं. याचबरोबर खणाचे दागिनेही सध्या लोकप्रिय आहेत.

पैठणीचे ड्रेस- पैठणीच्या साड्या प्रत्येकीकडे असतात. पण आता पैठणीचे ड्रेस शिवून मिळू लागले आहेत. एकतर आपल्याकडच्या साडीचा ड्रेस शिवायचा किंवा पैठणी ड्रेस मटेरियल घेऊन त्यातून ड्रेस किंवा वन पीस शिवायचा. सणाच्या काळात ही फॅशन तुफान लोकप्रिय आहे.याशिवाय फक्त जॅकेटही सध्या इन आहे.
खणाच्या साड्या- सध्या खणाच्या साड्यांना मोठं वलय प्राप्त झालं आहे. अनेक अभिनेत्री खणाच्या साड्या नेसतात. त्यांचे फोटोही इंस्टाग्रामवर शेअर करतात. त्यामुळे आपल्याकडे खणाची साडी असावी असे प्रत्येकीला वाटतेच. अशा साड्या ऑनलाईनही उपलब्ध आहेत. यात गर्द निळा, लाल, हिरवा, मोरपिशी, कॉफी, ग्रे कलर जास्त चलतीत आहेत.
खणाचे ड्रेस- खणाचे ड्रेसही सध्या लोकप्रिय आहेत. यातही डार्क रंगांना मागणी जास्त आहे. कुठल्याही कार्यक्रमाला हे ड्रेस छान लूक देतात.
इरकल साड्या – इरकल साड्याही वैशिष्ट्यपूर्ण आणि परफेक्ट लूक देतात. यात तुम्ही खणाचा ब्लाऊज घालू शकता. तसा ट्रेंड सध्या चालतो आहे. यातही डार्क रंगाचे आकर्षण जास्त आहे.
फेब्रिकचे दागिने- सोन्याबरोबरच आता ऑक्सिडाईजच्या दागिन्यांची क्रेझ आहे. त्याचबरोबर एथनिक लूकसाठी फेब्रिकचे दागिने हटके लूक देतात. खण,इकत,खादी आदी फेब्रिक वापरून गळ्यातले, कानातल्याचे विविध प्रकार करता येतात. जे दिसायलाही आकर्षक असतात.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here