आठवड्याच्या पहिल्या दिवशी अर्थात सोमवारी बाजारात बँकिंग शेअर्सचा बोलबाला दिसून आला. आयसीआयसीआय बँकेच्या निकालांमुळे बँक निफ्टीमध्ये जोरदार वाढ झाली आणि बँक निफ्टी विक्रमी उच्चांकावर बंद झाला. निफ्टी बँक 869 अंकांनी वाढून 41,192 वर बंद झाली. बँकेबरोबरच फायनान्स शेअर्समध्येही मोठी खरेदी झाली. दुसरीकडे, निफ्टीमध्ये व्यवहार ठिकठाक होता. मिड कॅपसह स्मॉल कॅपमध्येही विक्रीचा दबदबा राहिला. मिडकॅपने 500 हून अधिक अंकांची घसरण झाली. रिअल्टी, ऑटो आणि आयटी शेअर्सने दबाव निर्माण केला.
निफ्टी 10 अंकांनी वाढून 18,125 वर बंद झाला. त्याच वेळी, सेन्सेक्स 145 अंकांनी वाढून 60,967 वर बंद झाला. निफ्टी बँक 869 अंकांनी वाढून 41,192 वर बंद झाली. मिडकॅप 529 अंकांनी घसरून 30,553 वर बंद झाला. शेअर बाजाराची सुरुवात कमजोर झाली खरी पण बँकिंग शेअर्सच्या मजबूत सपोर्टमुळे बाजारातील कमकुवत स्थिती दूर केल्याचे जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे विनोद नायर यांनी सांगितले.
हेही वाचा: आधार कार्ड खराब झालंय? माहिती अपडेट करायचीय? जाणून घ्या सविस्तर…

शेअर बाजार
आज अर्थात मंगळवारी कशी असेल बाजारातली स्थिती ?
निफ्टीला 18,030-17,970 च्या जवळ चांगला सपोर्ट असल्याचे LKP सिक्युरिटीजचे रोहित सिंगरे म्हणाले. निफ्टी या पातळीवर टिकून राहिल्यास, पुल बॅक आणखी वाढू शकतो. सपोर्ट झोनच्या आसपास कोणतीही घसरण ही खरेदीची चांगली संधी असेल. वरच्या बाजूने, निफ्टीसाठी 18,225-18,300 च्या झोनमध्ये रझिस्टंस दिसून येतो आहे. 18,300 च्या वर गेल्यासच निफ्टीमध्ये तेजी येईल असेही सिंगरे म्हणाले.
शेअर बाजाराचे शॉर्ट टर्म स्ट्रक्चर कमकुवत दिसत आहे, असे कोटक सिक्युरिटीजचे श्रीकांत चौहान म्हणाले. पण जर निफ्टी 18,000-18,050 वर टिकून राहिल्यास चांगली पुल बॅक रॅली नाकारता येत नाही असेही ते म्हणाले. 18,050 पातळी दिवसाच्या व्यापाऱ्यांसाठी महत्त्वाचा सपोर्ट म्हणून काम करेल. जर निफ्टी यापेक्षा वर राहण्यात यशस्वी झाला तर 18,250-18,310 ची पातळीसुद्धा बघता येईल. जर निफ्टी 18,050 च्या खाली घसरला तर आणखी कमजोरी येऊ शकते असे चौहान म्हणाले.
हेही वाचा: Nykaa शेअर बाजारात होणार दाखल, लवकरच होईल IPOची घोषणा

शेअर मार्केट
निफ्टीसाठी 18,300 ची पातळी वरच्या बाजुला अतिशय महत्वाची असल्याचे ऍक्सिस सिक्युरिटीजचे राजेश पालवीया म्हणाले. जर ते या पातळीच्या वर टिकून राहिले तर 18,500-18,700 पातळी दिसेल असेही ते म्हणाले. दुसरीकडे, खाली निफ्टीने 18000 ची इंट्राडे सपोर्ट लेव्हल तोडली, तर 17,800-17,600 पर्यंत सुधारणा पाहू शकतो. डेली स्ट्रेंथ इंडिकेटर RSI overbought zone पासून कमी झाली आहे, जी उच्च स्तरावर नफा-बुकिंगचे संकेत देत आहे.
आज कोणत्या शेअर्सवर नजर ठेवाल ?
– आयसीआयसीआय बँक (ICICI BANK)
– ऍक्सिस बँक (AXIS BANK)
– ओएनजीसी
– टेक महिंद्रा (TECHM)
– JSW स्टील (JSW स्टील)
– बीपीसीएल
– बजाज फिनसर्व्ह लिमिटेड (BAJAJFINSV)
– एसबीआय लाईफ (SBI LIFE)
– बजाज ऑटो
– टाटा मोटर्स
नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
Esakal