बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री रवीना टंडन हिने नव्वदीचा दशक गाजवला आहे. तिने गोविंदा, नाना पाटेकर, सैफ अली खान, सलमान खान, शाहरूख खान,अक्षय कुमार यांसाख्या अनेक कलाकारांसोबत सुपरहिट चित्रपट केले आहेत. बॉलिवूडमध्ये अफेअरच्या चर्चा या होतच असतात. अक्षय आणि रवीनाच्या अफेअरच्याही चर्चा चांगल्याच रंगल्या होत्या.

‘मोहरा’ या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान अक्षय आणि रवीना यांच्यात जवळीक निर्माण झाली होती.
चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या शेवटच्या दिवशी अक्षयने लग्न करण्याचं वचन रवीनाला दिलं होतं.
पण या जोडीमध्ये एकाएकी दुरावा आला आणि ‘खिलाडीयों का खिलाडी’ या चित्रपटादरम्यान अक्षयचं नाव अभिनेत्री रेखासोबत जोडलं गेलं. एका गाण्यावरुन अक्षयचं रवीनासोबत भांडण देखील झालं होतं.
रवीनाने तिच्या आणि अक्षयच्या नात्यात आलेल्या दुराव्यासाठी रेखा यांनाच दोषी ठरवलं होतं.
एका मुलाखतीत रवीनाने सांगितलं, “अक्षय, रेखा आणि सुश्मिता सेन यांना एकत्र पाहिलं होतं. वारंवार विविध अभिनेत्रींसोबत त्याचं नाव जोडलं गेल्यामुळे मला माझ्या एका पत्रकार मित्राने सतर्क राहण्याचा इशारा दिला होता. पण,तरीही मी त्याला नेहमी माफ करावं अशी त्याची अपेक्षा असायची. जवळपास तीन वर्ष हे असंच सुरु होतं.”
नंतर रवीनाने अनिल थडानीशी लग्न केलं तर अक्षयने ट्विंकल खन्नाशी लग्न केलं. आतासुद्धा ते एकमेकांच्या समोर येणं किंवा एकत्र चित्रपट करणं टाळतात.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here