मराठी आणि हिंदी चित्रपट श्रुष्टीमध्ये आपल्या चतुरस्त्र अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य करणारा अभिनेता म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे उर्फ लक्ष्या. हे विनोदी अभिनेते म्हणून जास्त प्रसिद्ध होते. लक्ष्मीकांत बेर्डे यांचा जन्म 26 ऑक्टोबर 1954 रोजी झाला रत्नागिरी येथे झाला. आज त्यांची जयंती.
लक्ष्मीकांत यांनी शाळा आणि कॉलेज मधून त्यांनी बऱ्याच नाटकात कामे केली आणि बरीच बक्षिसे सुद्धा मिळवली. तो अत्यंत दमदार कामगिरीसाठी ओळखला जात असे. लक्ष्मीकांत बेर्डे यांना आपण मोठे झाल्यावर बस कंडक्टर व्हायचं असा त्यांचे स्वप्न होते, कारण कंडक्टर जवळील पैशाने भरलेली बॅग पाहून त्यांना अस वाटत होते कि हे सगळे पैसे आपलेच असतात. नंतर त्यांनी अभिनयात गोडी वाटू लागली. नाटकांमधून काम करत असताना, पुरुषोत्तम बेर्डे यांच्या “टूर टूर” या नाटकातून त्यांनी भूमिका केली आणि ती महाराष्ट्रभर गाजली. याच नाटकाने अभिनयाच्या क्षेत्रात त्यांना एक नवीन ओळख मिळवून दिली.त्यांचा पहिला चित्रपट “लेक चालली सासरला” येथून त्यांची सुरुवात झाली. त्यानंतर अभिनयाचे बरेच दरवाजे त्यांच्या साठी उघडले गेले. सचिन पिळगावकर दिग्दर्शित “अशी हि बनवाबनवी” या चित्रपटातील त्यांची साडी नेसून साकारलेली विनोदी भूमिका प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडून गेलीलक्ष्मीकांत बेर्डे यांचे, अशी हि बनवाबनवी, मराठा बटालियन, देखणी बायको नाम्याची, खतरनाक, नवरा मुंबईचा, धांगड धिंगा, धुमधडाका, धडाकेबाज, थरथराट, झपाटलेला, एक होता विदूषक अशी अनेक मराठी चित्रपट गाजली.लक्ष्मीकांत बेर्डेनी अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य केला आहे. ‘मैने प्यार किया’ हा लक्ष्मीकांत बेर्डेचा पहिला हिंदी चित्रपट होता.लक्ष्मीकांत बेर्डे आणि पत्नी प्रिया बेर्डे हि जोडी त्या वेळच्या काही प्रसिद्ध जोड्यांपैकी एक.लक्ष्मीकांत बेर्डे यांना अभिनय आणि स्वानंदी नावाची दोन मुले आहेत. त्यांचा मुलगा अभिनय हा सुद्धा चित्रपट अभिनेता आहे.मराठी चित्रपट सृष्टीचा हा विनोदाचा बादशाह अखेर 16 डिसेंबर 2004 रोजी आपल्यातून कायमचा निघून गेला.