इलेक्ट्रीक कार उत्पादक कंपनी टेस्लाचे (Tesla) मालक आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क (Elon Musk) यांनी इतिहास रचला आहे.

कोणत्याही श्रीमंत व्यक्तींच्या संपत्तीत एका दिवसात झालेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ आहे.

Tesla च्या Elon Musk यांच्या संपत्तीत 2.71 लाख कोटींची वाढ झाली आहे. Bloomberg Billionaires Index नुसार मस्क यांची संपत्ती 289 अब्ज डॉलर्स झाली आहे. सोमवारी एलन मस्क यांच्या संपत्तीत २.७१ लाख कोटी रुपयांची (३६.२ अब्ज डॉलर) वाढ झाली.

ब्लूमबर्ग बिलेनियर्स इंडेक्स (Bloomberg Billionaires Index) नुसार मस्क यांची संपत्ती आता २८९ अब्ज डॉलर्स झाली आहे. सोमवारी इलेक्ट्रीक कार उत्पादक कंपनी टेस्लाच्या मार्केट कॅपने 1 लाख कोटी डॉलर्सचा टप्पा पार केला. ही कामगिरी करणारी टेस्ला ही अमेरिकेतील सहावी कंपनी आहे.

सोमवारी, कंपनीचा शेअर १४.९ टक्क्यांनी वाढून १,०४५.०२ डॉलर्सवर पोहोचला. ही या शेअरची ५२ आठवड्यांची उच्चांकी पातळी आहे. शेअर्सच्या (Share Price) किंमतीत झालेल्या वाढीमुळे मस्क यांच्या संपत्तीत वाढ झाली आहे.

“हर्ट्ज ग्लोबल होल्डिंग्सनं (Hertz Global Holdings) १००००० कार्सची टेस्लाला ऑर्डर दिली आहे, १ लाख गा़ड्यांची टेस्लला ऑर्डर मिळाल्यामुळे कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी तेजी दिसून आली.”

“टेस्लामध्ये मस्क यांचा २.३ टक्के गिस्सा आहे. शेअर्समध्ये तेजी आल्यानं त्यांची संपत्ती एका दिवसात २.७१ लाख कोटी रूपयांनी वाढली आहे. याशिवाय, मस्क हे रॉकेट निर्माता स्पेसएक्सचे (SpaceX) प्रमुख शेअरहोल्डर आणि सीईओ आहेत.
CNBC च्या रिपोर्टनुसार, एक खासगी कंपनी ज्याची किंमत ऑक्टोबरच्या सेकंडरी शेअर विक्रीनुसार $100 अब्ज डॉलर्स आहे. २०२१ मध्ये मस्क यांच्या संपत्तीत ११९ अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे.” “मस्क यांची एकूण संपत्ती २८९ अब्ज डॉलर्स इतकी आहे, जी आता एक्सॉन मोबिल कॉर्प (Exxon Mobil Corp) या Nike Inc च्या मार्केट व्हॅल्यू पेक्षा अधिक आहे.
Bloomberg Billionaires Index नुसात इतिहासात आजपर्यंतची झालेली ही सर्वाधिक वाढ आहे. गेल्या वर्षी चिनी अब्जाधीश झोंग शानशान (Zhong Shanshan) ३२ बिलियन डॉलर्सची वाढ झाली होती. त्यांनी बाटलीबंद पाणी विक्री करणारी कंपनी नोंगफू स्प्रिंग कंपनी (Nongfu Spring Co) लिस्ट झाली होती.

Tesla ही ट्रिलियन डॉलर्स कंपन्यांच्या क्लबमध्ये सामील होणारी पहिली कार कंपनी आहे. यामध्ये आतापर्यंत Apple Inc, Amazon.com Inc, Microsoft Corp आणि Alphabet Inc या कंपन्यांचा समावेश आहे.
Esakal